Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ishan kishan sister death : वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषात इशान किशनवर दुःखाचा डोंगर! बहिणीचा मृत्यू

Ishan kishan sister death : भारत आणि न्युझीलंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजय मिळवला. काल ८ मार्च २०२६ रोजी, रविवारी रात्री जेव्हा अवघा देश टी-२० वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष साजरा करत होता, तेव्हा भारतीय संघाचा स्टार फलंदाज इशान किशन एका भीषण मानसिक वेदनेतून जात होता. ज्या वेळी इशान अहमदाबादच्या मैदानात धावांचा पाऊस पाडत होता, त्याच वेळी त्याचे वडील सिलीगुडी येथील एका शवागाराबाहेर आपल्या जवळच्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी उभे होते.

Ishan kishan sister death

भीषण कार अपघातात बहिणीचे निधन

'वनइंडिया हिंदी'ने टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ताच्या हवाल्यानुसार, म्हटले की, शुक्रवारी इशान किशनची चुलत बहीण आणि तिच्या पतीचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने किशन कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. इशानचे वडील प्रणव पांडे हे मुलाला फायनल खेळताना पाहण्यासाठी पाटणा विमानतळावरून अहमदाबादला रवाना होणार होते, परंतु या घटनेमुळे त्यांना आपला प्रवास रद्द करावा लागला.

वडिलांनी इशानला लागू दिली नाही कानकुण!

इशान किशनच्या वडिलांनी या दुःखाच्या प्रसंगातही अत्यंत संयम दाखवला. इशानचे मानसिक संतुलन बिघडू नये आणि त्याच्या खेळावर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांनी इशानला या घटनेची कल्पना फायनल होईपर्यंत दिली नाही. इशानने आपल्या वैयक्तिक दुःखाला बाजूला सारत २५ चेंडूत ५४ धावांची झंझावाती खेळी केली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आपल्या या खेळीद्वारे त्याने आपल्या बहिणीला एक प्रकारे श्रद्धांजलीच अर्पण केली आहे.

भीषण अपघातात चिमुकले बचावले!

या भीषण अपघातात बहिण आणि दाजींचा मृत्यू झाला असला तरी, एक चमत्कार घडला आहे. त्यांचे दोन लहान मुले (६ वर्षे आणि ३ महिने) या अपघातातून सुखरूप बचावली आहेत. "आमच्यावर खूप मोठे संकट आले आहे, अनर्थ झाला आहे," अशी भावना इशानच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

इशान किशन कोण आहे? (Who is Ishan Kishan?)

  • इशान किशन हा भारतीय क्रिकेट संघातील एक स्फोटक सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज आहे.
  • इशानचा जन्म १८ जुलै १९९८ (पाटणा, बिहार).
  • प्रामुख्याने डाव्या हाताने इशान फलंदाजी करतो.
  • इशानने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. इतक्या लहान वयात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
  • आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

हेही वाचा : IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+