Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Retention 2025 : आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज या वेळी प्रसिद्ध होणार! तुम्ही इथे पाहू शकता मोफत Live

IPL Retention 2025 : IPL रिटेन्शन २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी IPL 2025 मध्ये कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर आज केली जाणार आहे. सर्व 10 संघ आपल्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच गुरुवारी बीसीसीआयला सादर करणार आहेत.

आयपीएलमधील संघांनी त्यांचे कायम केलेले खेळाडू जाहीर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निश्चित केली आहे.

IPL Retention 2025

अनेक दिग्गज नावं होऊ शकतात आज रिलीज

आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक मोठी नावे रिलीज होत असतात. फ्रँचायझी त्यांच्या संघात सुधारणा करण्यासाठी खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतात. दहा फ्रँचायझी कोणते खेळाडू कायम ठेवतील हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांसारख्या क्रिकेट स्टार्सबद्दल बरीच चर्चा आहे. या सर्व खेळाडूंची नावे आज रिलीज होतील, असे मानले जात आहे.

रोहितला कायम ठेवणार की नाही?

गेल्या मोसमातील मोठ्या बदलांनंतर रोहित शर्माबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. हार्दिक पांड्या मुंबईत येऊन संघाचा कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्मा अन्य कोणत्या तरी संघाकडून खेळणार असल्याची चर्चा होती. याशिवाय गेल्या मोसमात ऋषभ पंतने पुनरागमन करून दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली. मात्र , आता त्याला संघातून मुक्त केले जाऊ शकते.

तुम्ही लाईव्ह प्रसारण पाहू शकता मोफत

  • तुम्ही IPL 2025 ची घोषणेसंदर्भातील थेट प्रसारण मोफत पाहू शकणार आहात. ते 31 ऑक्टोबरला भारतात स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर 4 वाजता प्रसारित केली जाईल.
  • याशिवाय, चाहत्यांना त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून Jio सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
  • लाइव्ह रिटेन्शन Jio वर मोफत पाहता येते.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने यावर्षी अपडेशन रिटेन्शन नियम सादर केले आहेत, या अंतर्गत संघ जास्तीत जास्त सहा खेळाडू राखू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+