Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Auction 2025 : श्रेयस अय्यर बनला IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, कितीची लागली बोली

IPL Auction 2025 latest Live updates: इंडियन प्रीमिअर लीग (IPL- 2025) च्या बहुचर्चित मेगा लिलावाला आज सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे सुरूवात झालेली आहे. या ठिकाणी दोन दिवस लिलाव चालणार आहे. दरम्यान, या लिलावाच्या सुरूवातीलाच भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध चांगला धावा काढल्या, वाचा सविस्तर..

श्रेयस अय्यरची 26.75 कोटींत पंजाबने केली खरेदी

मार्की यादीतील तिसरा खेळाडू श्रेयस अय्यरला पंजाबने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अय्यरच्या आधी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाताने गेल्या मिनी लिलावात 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

एक दिवस आधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना अय्यरने गोव्याविरुद्ध 57 चेंडूत नाबाद 130 धावा केल्या होत्या. अय्यर गेल्या वर्षी कोलकात्याकडून खेळला आणि संघाचे नेतृत्व केले आणि आयपीएल-15 चे विजेतेपद जिंकले.

आयपीएल लिलावाला सुरवात झाल्यानतंर पहिल्या सेटमध्ये जॉस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, मिचेल स्टार्क, या खेळाडूंचा समावेश होता. पहिलेच नाव पंजाब किंग्सचा माजी गोलंदाज अर्शदीप सिंग यांचे नाव आले. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूव चेन्नई सुपर किंग्सने पहिली बोली लावली. त्यानंतर गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात केली.

IPL 2025

12 कोटी येईपर्यंत राजस्थान रॉयल्सने आघाडी घेतली होती. अर्शदीप सिंग हा RR कडे जातोय असे वाटत असताना सनरायझर्स हैदराबादने पॅडल उचललं आणि त्यांनी अर्शदीपची किंमत १५.५० कोटींपर्यंत नेले. त्यानंतर पंजाब किंग्सला RTM कार्ड वापरणार का असे विचारले गेले आणि त्यांनी 18 कोटीची बोली लावून अर्शदीपला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले.

कागिसो रबाडाला १०.७५ कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले. PBKS ला RTM वापरणार का असे विचारले गेले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर आयपीएल २०२४ विजेत्या श्रेयस अय्यरचे नाव आले. कोलकाता नाईट रायडर्सने २ कोटींची बोली लावली. ७ कोटींपर्यंत पंजाब किंग्सने माघार घेतली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत आले. PBKS vs DC यांच्यात मग शर्यत सुरू झाली. या दोन्ही संघांनी श्रेयसची किंमत १६ कोटींपर्यंत नेली आणि तोपर्यंत KKR ने माघार घेतली होती.

KKRला दिले होते जेतेपद जिंकून

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये मागील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद जिंकून दिले होते. त्याने आयपीएलमध्ये 116 सामन्यांत 3127 धावा केल्या आहेत. पंजाब आणि दिल्ली माघार घेण्यास तयार नव्हते. RCB ने विराट कोहलीला 21 कोटींत आपल्या संघात कायम राखले होते आणि तो भारताचा सर्वात महागडा खेळाडू होता. दिल्ली व पंजाब यांनी ही रक्कमही ओलांडली. त्यानंतर हेनरिच क्लासेन (23 कोटी) याचा विक्रमही श्रेयससाठी मोडला गेला. SRH ने आफ्रिकेच्या फलंदाजाला 23 कोटींत संघात कायम राखले होते. पण, पंजाबने आज 110 कोटी शिल्लक रक्कमेतील सर्वात जास्त रक्कम श्रेयससाठी खर्च करण्याचा निर्धार केला होता.

दोन दिवस चालणार लिलाव

दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात 577 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील जास्तीत जास्त 204 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण सर्व संघांमध्ये मिळून 204 खेळाडूंतीच जागा शिल्लक आहे. लिलावापूर्वी 10 संघांनी 46 खेळाडूंना रिटेन केले आहे. आता 204 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 641.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+