IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला ऋषभ पंत, रक्कम वाचून व्हाल थक्क, श्रेयस दुसऱ्या स्थानावर!
IPL Auction 2025 latest Live updates: ऋषभ पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. लखनौ संघाने त्याच्यावर 27 कोटींची बोली लावून खरेदी केले, तर त्याच्या खालोखाल आता पंजाबने श्रेयस अय़्यरला 26.75 कोटीत खरेदी केले आहे.
पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लखनौने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतच्या आधी पंजाबने अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतले.
लखनौ आणि बंगळुरूने सुरुवातीला पंतसाठी बोली लावली. सनरायझर्स हैदराबादने नंतर 11.75 कोटी रुपयांमध्ये प्रवेश केला, परंतु लखनौने 20.75 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली. यानंतर दिल्लीने त्यांचे आरटीएम कार्ड वापरले, त्यानंतर लिलावकर्त्याने लखनऊला त्यांची अंतिम बोली मागितली, ज्यावर संघाने सर्वाधिक बोली लावली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

आय़पीएलमध्ये ऋषभचे चांगली कामगिरी
ऋषभ पंतने आयपीएलमध्ये आपल्या कारकिर्दीत ३,००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी सरासरी 36 च्या आसपास आहे, जी चांगली आकृती म्हणून पाहिली जाते. पंतचा स्ट्राईक रेटही 145-150 च्या दरम्यान आहे, यावरून त्याच्या आक्रमक फलंदाजीचे संकेत मिळतात. पंतने 2020 च्या आयपीएल हंगामात 34.5 च्या सरासरीने 343 धावा करत चमकदार कामगिरी केली होती.
कार अपघातानंतर त्याचे IPLमध्ये कमबॅक
2020 मध्ये पंतला दिल्लीने कर्णधार बनवले होते. यानंतर पुढच्याच वर्षी कार अपघातामुळे तो संघाबाहेर होता. 2024 मध्ये पंत पुन्हा दिल्लीच्या कर्णधारपदी परतला. त्याने 13 सामन्यात 446 धावा केल्या ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
शमीला 10 कोटींत हैदराबादने विकत घेतले
दुसऱ्या मार्की लिस्टमधील कॅप्ड खेळाडू मोहम्मद शमीला हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मागील हंगामात भारताचा वेगवान गोलंदाज शमी दुखापतीमुळे खेळला नव्हता. यापूर्वी तो 2023 मध्ये गुजरातकडून खेळला होता. या मोसमात, त्याने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतील पर्पल कॅप धारक देखील होता.
श्रेयस दुसऱ्या स्थानावर गेला पंजाबने 26.75 कोटीत खरेदी केले
इंडियन प्रीमिअर लीग (IPL- 2025) च्या बहुचर्चित मेगा लिलावाला आज सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे सुरूवात झालेली आहे. या ठिकाणी दोन दिवस लिलाव चालणार आहे. दरम्यान, या लिलावाच्या सुरूवातीलाच भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे.
मार्की यादीतील तिसरा खेळाडू श्रेयस अय्यरला पंजाबने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अय्यरच्या आधी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाताने गेल्या मिनी लिलावात 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
एक दिवस आधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना अय्यरने गोव्याविरुद्ध 57 चेंडूत नाबाद 130 धावा केल्या होत्या. अय्यर गेल्या वर्षी कोलकात्याकडून खेळला आणि संघाचे नेतृत्व केले आणि आयपीएल-15 चे विजेतेपद जिंकले.
आयपीएल लिलावाा सुरवात झाल्यानतंर पहिल्या सेटमध्ये जॉस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, मिचेल स्टार्क, या खेळाडूंचा समावेश होता. पहिलेच नाव पंजाब किंग्सचा माजी गोलंदाज अर्शदीप सिंग यांचे नाव आले. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूव चेन्नई सुपर किंग्सने पहिली बोली लावली.त्यानंतर गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात केली.
12 कोटी येईपर्यंत राजस्थान रॉयल्सने आघाडी घेतली होती. अर्शदीप सिंग हा RR कडे जातोय असे वाटत असताना सनरायझर्स हैदराबादने पॅडल उचललं आणि त्यांनी अर्शदीपची किंमत १५.५० कोटींपर्यंत नेले. त्यानंतर पंजाब किंग्सला RTM कार्ड वापरणार का असे विचारले गेले आणि त्यांनी 18 कोटीची बोली लावून अर्शदीपला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले.
कागिसो रबाडाला १०.७५ कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले. PBKS ला RTM वापरणार का असे विचारले गेले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर आयपीएल २०२४ विजेत्या श्रेयस अय्यरचे नाव आले. कोलकाता नाईट रायडर्सने २ कोटींची बोली लावली. ७ कोटींपर्यंत पंजाब किंग्सने माघार घेतली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत आले. PBKS vs DC यांच्यात मग शर्यत सुरू झाली. या दोन्ही संघांनी श्रेयसची किंमत १६ कोटींपर्यंत नेली आणि तोपर्यंत KKR ने माघार घेतली होती.
KKRला दिले होते जेतेपद जिंकून
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये मागील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद जिंकून दिले होते. त्याने आयपीएलमध्ये 116 सामन्यांत 3127 धावा केल्या आहेत. पंजाब आणि दिल्ली माघार घेण्यास तयार नव्हते. RCB ने विराट कोहलीला 21 कोटींत आपल्या संघात कायम राखले होते आणि तो भारताचा सर्वात महागडा खेळाडू होता. दिल्ली व पंजाब यांनी ही रक्कमही ओलांडली. त्यानंतर हेनरिच क्लासेन (23 कोटी) याचा विक्रमही श्रेयससाठी मोडला गेला. SRH ने आफ्रिकेच्या फलंदाजाला 23 कोटींत संघात कायम राखले होते. पण, पंजाबने आज 110 कोटी शिल्लक रक्कमेतील सर्वात जास्त रक्कम श्रेयससाठी खर्च करण्याचा निर्धार केला होता.
दोन दिवस चालणार लिलाव
दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात 577 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील जास्तीत जास्त 204 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण सर्व संघांमध्ये मिळून 204 खेळाडूंतीच जागा शिल्लक आहे. लिलावापूर्वी 10 संघांनी 46 खेळाडूंना रिटेन केले आहे. आता 204 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 641.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.












Click it and Unblock the Notifications