आयपीएलमध्ये ठरला हुकमी एक्का! आता T-20 मॅचमध्ये या खेळाडूने 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स! व्हिडिओ बघा
IPL cricketer Digvesh Rathi takes 5 wickets in 5 balls : एलएसजी अर्थात लखनऊ जायंट्सकडून खेळताना आयपीएलमध्ये संघासाठी मोक्याच्या वेळी विकेट्स मिळवून देणारा गोलंदाज म्हणून दिग्वेश राठी ओळखला जातो. आयपीलमध्ये त्याची सरासरी कामगिरी होती. त्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी दिग्वेश राठीने टी-२० सामन्यात केली आहे.

नव्या दमाच्या खेळाडूंनी यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवली. यामध्ये दिग्वेश राठीने आपली कामगिरी चोख बजावली आणि सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. त्यानंतर या तरुण फिरकी गोलंदाजाने अलीकडेच एका टी-२० सामन्यात ५ चेंडूत ५ बळी घेऊन जोरदार कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात तो चमकदार कामगिरी करताना दिसला.
Stumbled upon this clip of Digvesh Rathi taking 5 in 5 in a local T20 game. Just a glimpse of the talent that made him a breakout star for @LucknowIPL in IPL 2025. pic.twitter.com/i8739cjxpk
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) June 16, 2025
संजीव गोयंकाकडून कौतूक
दिग्वेश राठीने लखनऊ जायंट्सकडून ही आयपीएल स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर लखनऊ जायंट्सचे संघमालक संजीव गोएंकाही जाम खूश झाले आहेत. त्यांनी दिग्वेशचे कौतुक तर केलेच पण त्यानंतर त्यांनी ट्विटरवर हा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांन दिग्वेशचा पाच चेंडूत पाच बळी घेतलेला व्हिडिओ १६ जून रोजी एक्सवर ेअर केला आहे.
काय आहे गोयंकांची पोस्ट
संजीव गोयंका हे दिग्वेशच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. त्यांनी व्हिडिओसोहतच पोस्ट केलीआहे. आयपीएल २०२५ मध्ये एलएसजीसाठी ब्रेकआउट स्टार बनवणाऱ्या प्रतिभेची ही झलक आहे. या व्हिडिओमध्ये राठीने तीन फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आणि दोन एलबीडब्ल्यू बाद केले. काही लोकांनी एलबीडब्ल्यू निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी, गोलंदाजीची अचूकता आणि तीक्ष्णता यांनी सर्वांचे मन जिंकले.
आयपीएलमध्ये किती रुपयांची लागली दिग्वेशवर बोली
आयपीएल २०२५ मध्ये राठीच्या कामगिरीने दिग्वेश राठीला मेगा लिलावात एलएसजीने ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतले. त्याने त्याच्या पहिल्याच हंगामात १३ सामने खेळले आणि १४ बळी घेतले, ज्यामुळे तो संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. त्याच्या कामगिरीची खास गोष्ट म्हणजे त्याने उच्च-स्कोअरिंग सामन्यांमध्येही ८.२५ ची इकॉनॉमी राखली आणि ३०.६४ च्या सरासरीने विकेट घेतल्या.
दिग्वेशचे नोटबूक सेलिब्रेशन अन्दिग्वेशचे आयपीएल २०२५ मधील प्रदर्शन
दिग्वेशचे 'नोटबुक सेलिब्रेशन' हा चर्चेचा विषय बनला. विकेट घेतल्यानंतर तो एका काल्पनिक नोटबुकमध्ये काहीतरी लिहिताना दिसायचा, ज्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. तथापि, या सेलिब्रेशनमुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आणि एका सामन्याच्या निलंबनालाही सामोरे जावे लागले होते. आयपीएल २०२५ मध्ये दिग्वेश राठी याने तेरा सामन्यात १४ गडी बाद केले. त्याने काही सामने आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकून दिले तर काही सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी हवी तेव्हा संघाला विकेट मिळवून दिल्या. एलएसजीकडून खेळताना त्याने १४ विकेट्स मिळवल्या. यामध्ये ३० धावांत २ गडी हे त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications