Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Auction 2025 : आयपीएल लिलावात या 5 खेळाडूंची सर्वाधिक कमाई होणार! जितेश शर्माचे नाव देखील यादीत

IPL Auction 2025 : 25 नोव्हेंबर रोजी IPL लिलाव सौदी अरेबिया मध्ये पूर्ण झाला. 10 फ्रँचायझींनी त्यांना हवे असलेले खेळाडू आपापल्या संघात समाविष्ट केले आहेत. जगातील अव्वल क्रिकेट टॅलेंटना साइन करण्यासाठी संघांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. या लेखात आपण त्या पाच खेळाडूंबद्दल पाहणार आहोत ज्यांना लिलावात सर्वात जास्त पैसा मिळाला.

वेंकटेश अय्यर 8 वरुन 23.75 कोटींपर्यंत पोहचला

वेंकटेश अय्यर असा खेळाडू आहे जो 8 वरुन 23.75 कोटींपर्यंत पोहचला आहे. या यादीत पहिले नाव वेंकटेश अय्यरचे आहे, ज्याने 2025 च्या आयपीएल लिलावात सर्वाधिक नफा कमावला होता. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 2022 ते 2024 या कालावधीत 8 कोटी रुपये प्रति हंगामात कायम ठेवले होते. यावेळी, KKR ने त्याच्यावर बोलीही लावली अन् अखेरीस त्याला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. व्यंकटेश आता याच संघाकडून खेळणार आहे. त्याच्या कमाईत 15.75 कोटींची वाढ झाली आहे.

ipl auction 2025

जितेश शर्मा 20 लाखांवरून 11 कोटी

IPL 2022 मेगा लिलावात पंजाब किंग्जने 20 लाखांच्या मूळ किमतीवर त्याला करारबद्ध केले तेव्हा जितेश शर्मा एक आयपीएल न खेळलेला खेळाडू होता. PBKS ने त्याला 2023 आणि 2024 मध्ये त्याच किंमतीवर कायम ठेवले. त्या दोन वर्षांत शर्मा भारताकडून खेळला आणि पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्वही केले. जितेशवर आयपीएल 2025 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 11 कोटी रुपयांची मोठी बोली लागली. त्यामुळे त्याच्या कमाईत 10.8 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

'त्या' बोलीत ऋषभ पंत झाला कोट्यधीश

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी ऋषभ पंतच्या कमाईत 11 कोटींनी वाढ झाली, ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्स संघात पहिल्या क्रमांकावर कायम होता. DC ने त्याला ₹16 कोटींमध्ये कायम ठेवले आणि तो त्याच किंमतीत पुढील दोन हंगामांसाठी संघात राहिला. 2025 च्या आयपीएल लिलावापूर्वी पंतने दिल्ली कॅपीटलला सोडले. दिल्लीन त्यांच्यासाठी आरटीएम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला, तर लखनऊ सुपरजायंट्सने किंमत वाढवून 27 कोटी केली. त्यामुळे पंतच्या कमाईत 11 कोटींची वाढ झाली आहे.

चहलची कमाईत 11.5 कोटींनी वाढली

IPL 2025 च्या लिलावात भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा आणखी एक खेळाडू आहे ज्याचा पगार ₹ 10 कोटींनी वाढला आहे. या लेगस्पिनरला पंजाब किंग्जने यावर्षी 18 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. राजस्थान रॉयल्सने 2022 ते 2024 या काळात चहलला 6.5 कोटी रुपये दिले. त्यामुळे चहलच्या पगारात 11.5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

श्रेयस अय्यरच्या कमाईत 14.5 कोटी रुपयांची वाढ

कोलकाता नाइट रायडर्सला मेगा लिलावापूर्वी आयपीएल ट्रॉफी विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला कायम ठेवायचे होते. मात्र, अय्यर यांनी लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला कारण आयपीएल फ्रँचायझींनी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात बोली लावली. पंजाब किंग्सने अखेरीस त्याला 26.75 कोटींमध्ये साइन केले, यापुर्वी त्याला केकेआरने 2022 ते 2024 या कालावधीत 12.25 कोटींत खरेदी केले होते आता त्याच्या कमाईत दुप्पटीवर 14.5 कोटी रुपयांचा नफा झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+