IPL Mega Auction 2025 : आयपीएलमध्ये कोणत्या खेडाळूची कितीला झाली विक्री, वाचा संपूर्ण यादी
ipl auction 2024 players list marathi : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा मेगा लिलाव सुरू झाला आहे. दोन दिवसीय हा कार्यक्रम सौदी अरेबियातील जेद्दाह येथील आबादी अल-जवाहर एरिना येथे होत आहे. या लिलावात सद्या जोरदार बोली लावून चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात ओढण्यासाठी चढाओढ लागलेली आहे.
IPL 2025 हंगामासाठी संघ त्यांचे संपूर्ण रोस्टर पुन्हा तयार करण्यासाठी सज्ज आहेत. दोन दिवसीय मेगा लिलावात 10 आयपीएल फ्रँचायझींनी सहभाग घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या खेळाडूवर आतापर्यंत कितीची बोली लावली गेली आहे. व तो खेळाडू किती रुपयाला खरेदी करण्यात आलेला आहे. (ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत)

आयपीएलमध्ये कोणता खेळाडू किती किमतीला विकला गेला?
- अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने RTM वापरून 18 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
- कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
- श्रेयस अय्यरला PBKS ने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
- जोस बटलरला गुजरात टायटन्सने 15.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
- मिचेल स्टार्कला 11.75 कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले आहे.
- मोहम्मद शमीला SRH ने 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
- युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना खरेदी केले
- जीटीने मोहम्मद सिराजला 12.25 कोटींना खरेदी केले
- लियाम लिव्हिंगस्टोनला आरसीबीने 8.75 कोटी रुपयांना खरेदी केले
आयपीएल लिलावात मार्की सेट म्हणजे काय?
प्रत्येकी सहा खेळाडूंसह दोन मार्की सेट आहेत. केएल राहुल, ऋषभ पंत, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि इतर अनेक मोठी नावे मार्की सेटचा भाग आहेत.
IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण?
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वीच्या रेकॉर्डमध्ये केकेआरने या वेगवान गोलंदाजाला 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याला 20.5 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होते, तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन 18.5 कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लखनौने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतच्या आधी पंजाबने अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतले.












Click it and Unblock the Notifications