IPL लिलावानंतर टीममध्ये मोठे बदल! सर्व 10 संघात कुणा कुणाचा समावेश? वाचा कशी असेल Playing XI?
IPL 2026 Post-Auction All 10 Teams Final Squads and Best Playing XI : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९ व्या हंगामासाठी झालेला मिनी लिलाव ऐतिहासिक ठरला आहे. अबू धाबीच्या एतिहाद ॲरिनामध्ये पार पडलेल्या या लिलावात सर्व १० फ्रँचायझींनी एकूण २१५.४५ कोटी रुपये खर्चून ७७ खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २५.२० कोटी रुपयांना विकत घेत लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरवले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत वीर या अनकॅप्ड खेळाडूवर १४.२० कोटी उधळून सर्वांना थक्क केले. लिलावानंतर आता सर्व संघांचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रत्येक संघाची संभाव्य आणि सर्वात 'धडाकेबाज' अंतिम ११ (Playing XI) कशी असेल, हे जाणून घेऊया.

१. मुंबई इंडियन्स (MI)
- स्क्वाॉडमधील प्रमुख: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह.
- संभाव्य Playing XI: क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, हार्दिक पांड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
२. चेन्नई सुपर किंग्स (CSK)
- स्क्वाॉडमधील प्रमुख: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, संजू सॅमसन.
- संभाव्य Playing XI: संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, एमएस धोनी, प्रशांत वीर, नूर अहमद, नॅथन एलिस, मॅट हेन्री, खलील अहमद.
३. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
- स्क्वाॉडमधील प्रमुख: अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमरून ग्रीन, रिंकू सिंह.
- संभाव्य Playing XI: रचिन रवींद्र, टिम सीफर्ट, अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, कॅमरून ग्रीन, रिंकू सिंह, रमनदीप सिंह, सुनील नरेन, हर्षित राणा, मथीशा पाथिराना, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
४. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
- स्क्वाॉडमधील प्रमुख: विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट.
- संभाव्य Playing XI: विराट कोहली, फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जितेश शर्मा, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा.
५. गुजरात टायटन्स (GT)
- संभाव्य Playing XI: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
६. सनरायझर्स हैदराबाद (SRH)
- संभाव्य Playing XI: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, झीशान अंसारी.
७. लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
- संभाव्य Playing XI: एडेन मार्कराम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बदोनी, हिम्मत सिंह, अब्दुल समद, वानिंदू हसरंगा, मोहम्मद शमी, मयंक यादव, दिग्वेश राठी, आवेश खान.
८. राजस्थान रॉयल्स (RR)
- संभाव्य Playing XI: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, ध्रुव जुरेल, शुभम दुबे, डोनोवन फरेरा, शिमरॉन हेटमायर, सॅम करन, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा.
९. दिल्ली कॅपिटल्स (DC)
- संभाव्य Playing XI: केएल राहुल, बेन डकेट, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, अकीब नबी, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी. नटराजन.
१०. पंजाब किंग्स (PBKS)
- संभाव्य Playing XI: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अझमतुल्ला ओमरझाई, शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, यश ठाकूर.












Click it and Unblock the Notifications