IPL 2026 All Teams Full Squad : लिलावानंतर 10 संघांचे चित्र स्पष्ट;पाहा कोणाच्या ताफ्यात कोण शिलेदार
IPL 2026 All Teams Players List : क्रिकेट जगतात सर्वात मोठी मानली जाणारी 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL 2026) आता एका नव्या उत्साहात सज्ज झाली आहे. 28 मार्च 2026 पासून या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता असून, उद्या १२ मार्च रोजी याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे समजते.
अबू धाबी येथे १६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मिनी लिलावात (IPL 2026 Auction) फ्रँचायझींनी पैशांचा पाऊस पाडला. या लिलावात एकूण ७७ खेळाडूंवर बोली लागली, ज्यामध्ये ४८ भारतीय आणि २९ परदेशी खेळाडूंचा समावेश होता.
सर्व १० संघांनी मिळून एकूण २१५.४५ कोटी रुपये खर्च केले. या लिलावात कॅमेरॉन ग्रीन हा २५.२० कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. चला तर मग जाणून घेऊया, लिलावानंतर सर्व १० संघांची अंतिम फळी कशी आहे.

१. मुंबई इंडियन्स (MI)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघात यावेळी अनुभवासोबतच तरुणाईचा मेळ पाहायला मिळत आहे. ट्रेंट बोल्टच्या पुनरागमनाने त्यांची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.
प्रमुख खेळाडू : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, विल जैक्स, शार्दुल ठाकूर, तिलक वर्मा.
२. चेन्नई सुपर किंग्स (CSK)
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसकेने संजू सॅमसनला संघात सामील करून मोठी खेळी खेळली आहे. एमएस धोनीचा अनुभव संघासाठी नेहमीप्रमाणे मोलाचा ठरेल.
प्रमुख खेळाडू : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, संजू सॅमसन, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद, राहुल चहर, सरफराज खान.
३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)
आरसीबीने यंदा रजत पाटीदारकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. विराट कोहलीसोबतच संघात भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांच्या समावेशाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रमुख खेळाडू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, जोश हॅजलवुड, भुवनेश्वर कुमार.
४. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
लिलावातील सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन आता केकेआरच्या जांभळ्या जर्सीत दिसेल. रचिन रवींद्र आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांच्यावर संघाची मदार असेल.
प्रमुख खेळाडू : कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, सुनील नरेन, रचिन रवींद्र, मथिशा पाथिराना, हर्षित राणा, अजिंक्य रहाणे, वरुण चक्रवर्ती.
५. सनरायझर्स हैदराबाद (SRH)
पॅट कमिन्सच्या आक्रमक नेतृत्वाखाली हैदराबादने इशान किशनला आपल्या ताफ्यात घेतले आहे. लियाम लिविंगस्टोन आणि हेनरिक क्लासेन यांच्यामुळे त्यांची फलंदाजी स्फोटक झाली आहे.
प्रमुख खेळाडू : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, हर्षल पटेल, लियाम लिविंगस्टोन.
६. गुजरात टायटन्स (GT)
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने जोस बटलरला संघात घेऊन सलामीची जोडी भक्कम केली आहे. मोहम्मद सिराज आणि राशिद खान ही जोडी विरोधी फलंदाजांसाठी आव्हान ठरेल.
प्रमुख खेळाडू : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, राशिद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया.
७. लखनौ सुपर जायंट्स (LSG)
ऋषभ पंतच्या आगमनाने लखनौचा संघ कागदावर अत्यंत प्रबळ दिसत आहे. मोहम्मद शमी आणि एनरिक नॉर्टजे यांच्यामुळे त्यांचा वेगवान मारा धारदार झाला आहे.
प्रमुख खेळाडू : ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, मोहम्मद शमी, एडन मार्कराम, वानिंदु हसरंगा, मयंक यादव, अर्जुन तेंडुलकर.
८. राजस्थान रॉयल्स (RR)
राजस्थानने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. यशस्वी जैस्वाल आणि जोफ्रा आर्चर हे संघाचे मुख्य आधारस्तंभ असतील.
प्रमुख खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, सॅम करन, जोफ्रा आर्चर, रियान पराग, रवी बिश्नोई, ध्रुव जुरेल.
९. दिल्ली कॅपिटल्स (DC)
दिल्लीने केएल राहुलला आपल्या संघात स्थान दिले असून मिचेल स्टार्कच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू उजवी झाली आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी कायम आहे.
प्रमुख खेळाडू : केएल राहुल, मिचेल स्टार्क, अक्षर पटेल, कुलदीप यादव, डेव्हिड मिलर, टी नटराजन, पृथ्वी शॉ.
१०. पंजाब किंग्स (PBKS)
श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे पंजाबच्या मधल्या फळीला मजबुती मिळाली आहे. युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग ही जोडी फिरकी आणि वेगाचा चांगला मेळ घालेल.
प्रमुख खेळाडू : श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मार्कस स्टोइनिस, नेहल वढेरा, मार्को जॅनसेन, शशांक सिंग.












Click it and Unblock the Notifications