Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 :"तू माझ्यासारखा खेळू शकत नाही!" रोहित शर्मा असं का म्हणाला? अब्दुल समदसोबत बोलताना वक्तव्य

IPL 2025 : भारताचा आक्रमक शैलाचा सलामीवर फलंदाज रोहीत शर्माने गेल्या काही सामन्यात आपल्या उत्तम फलंदाजीने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे. आता त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे, पण अलिकडे त्याने एक वक्तव्य केले आणि त्याची चर्चा खूपच होत आहे.

IPL 2025 You can t play like me why did Rohit Sharma say

"तू माझ्यासारखा खेळू शकत नाही..!"

रोहित शर्माने एका खेळाडूला "तू माझ्यासारखा खेळू शकत नाही..!" असे म्हटले आहे, आता हे विधान का त्याने म्हटले हे फारसे समजण्याजोगे नाही, अशा स्थितीत आपण त्याने हे वक्तव्य का केले हे समजून घेऊया.

Take a Poll

संवादाचा व्हिडिओ व्हायरल

त्याचे झाले असे की, भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा एका खेळाडूला टीप्स देत होता. तो फलंदाज लखनऊ सुपर जायंट्सचा अब्दुल समद हा होता. त्याला बोलतानाचे वक्तव्य आता व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत अब्दुल समद याला रोहित शर्मा फलंदाजीच्या टिप्स देताना दिसतो. मुंबईसोबत होणाऱ्या सामन्याआधीची आज 27 एप्रिल 2025 रोजीची ही चर्चा आहे.

नेमके काय म्हणाला रोहित?

रोहित शर्मा नेहमी नवख्या खेळाडूंवा टिप्स देत असतो. याआधी त्याने सनराईजर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा याला टिप्स दिल्या होत्या. त्यावेळी रोहित अब्दुल समदला टीप्स देताना म्हणाला की, "या पायाने किंवा त्या पायाने मार..तुला माहितेय का तु काय करतोय कारण प्रत्येक खेळपट्टीची एक गती असते.

"प्रत्येक खेळाडूची पद्धत वेगळी असते .."

रोहित टीप्स देताना म्हणाला, "प्रत्येक खेळाडूची पद्धत वेगळी असते कुठलीही क्षमता असो, कसलीही प्रतिभा असो, तंत्र काहीही असो, काही गोष्टी तंत्राशिवाय चालत नाहीत. ते स्वीकारा, तू माझ्यासारखा खेळू शकत नाहीस, मी तुझ्यासारखा खेळू शकत नाही. तुझ्यात एक प्रतिभा आहे. जर मी तुझी कॉपी करायला गेलो किंवा तू माझी कॉपी करायला गेला, किंवा मी कॉपी करायला गेलो तर आपले करियर यातच संपून जाईल."

कोण आहेत अब्दुल समद?

अब्दुल समद हा लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे, तो त्याच्या हार्ड हिटिंग क्षमतेसाठी ओळखले जातो. अब्दुल समदने 2020 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि SRH ने त्याची निवड केली, ज्यामुळे तो IPL करार मिळवणारा परवेझ रसूल, मंजूर दार आणि रसीख सलाम यांच्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील चौथा क्रिकेटपटू बनला आहे.

गेल्या काही वर्षांत तो मधल्या फळीत काही महत्त्वपूर्ण धावा करत संघातील एक नियमित वैशिष्ट्य बनला. IPL 2025 च्या आधी, J&K फलंदाज लखनऊने त्याला 4.2 कोटींमध्ये खरेदी केले होते.

अब्दुल समद आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो

अब्दुल समद आयपीएलमध्ये लखनऊ सूपर जायंट्स संघाकडून खेळतो.

अब्दुल समद कोणत्या राज्याचा खेळाडू आहे?

अब्दुल समद जम्मू काश्मीरचा खेळाडू आहे.

अब्दुल समद कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

अब्दुल समद भारतीय खेळाडू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+