आयपीएल दरम्यान यशस्वी जयस्वालचा मोठा निर्णय, लवकरचं नवीन संघात होणार सहभागी
Yashasvi Jaiswal: राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वाल आयपीएल 2025 या सीझनमध्ये अद्याप फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकत नाही. सलग तीन सामने खेळूनही तो पुन्हा लय मिळवू शकला नाही. यशस्वी जयस्वालच्या क्षमतेबद्दल शंका नाही. तो त्यांच्या स्वत:च्या जिवावर सामना जिंकून देऊ शकतो.
आयपीएलच्या दरम्यान एक मोठा निर्णय घेऊन यशस्वी जयस्वालने सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपला संघ सोडून दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, जयस्वालने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वाल मुंबई संघाकडून खेळतो. आता त्यांनी एनओसी मागितली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तो दुसऱ्या संघाकडून खेळण्यास पात्र होईल. इंडियन एक्सप्रेसने याची पुष्टी केली आहे.

जयस्वालने वयाच्या 23 व्या वर्षी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याच्या आधी अर्जुन तेंडुलकरही मुंबई सोडून गोव्याला गेला होता. तो गोव्याकडूनही खेळतो. अर्जुन तेंडुलकरला मुंबईत संधी मिळत नव्हत्या, त्यामुळे तो गोव्याच्या संघात दाखल झाला आहे.
यशस्वी जयस्वाल 19 वर्षांखालील संघात असल्यापासून मुंबईकडून खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी धमाकेदार खेळी केल्यानंतर जयस्वाल प्रसिध्दी झोतात आला होता. मुंबईकडून खेळून स्वतःचे नाव कमावल्यानंतर तो टीम इंडियाकडून खेळण्यात आणि कसोटी संघात सलामीला येण्यातही यशस्वी झाला आहे.
यशस्वी जयस्वाल यावर्षीच्या आयपीएलमध्ये फ्लॉप ?
जयस्वालने आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त 3 सामने खेळले आहेत आणि त्याची कामगिरी विशेष राहिलेली नाही. या आयपीएल हंगामात त्याने फक्त 34 धावा केल्या आहेत. तो सुरुवातीच्या षटकांत बाद होत आहे आणि हे राजस्थान रॉयल्ससाठी चांगले लक्षण नाही.












Click it and Unblock the Notifications