Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हर्दिक पांड्यावर IPL मध्ये का बंदी घालण्यात आली? रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार

IPL 2025: मागील काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळा पत्रकाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. मात्र आयपीएलचं नुकतेच वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे आता आयपीएलची प्रतीक्षा संपली आहे. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी सारख्या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना ईडन गार्डन्स स्टेडियममध्येच होणार आहे. यानंतर आणखी काही मोठ्या संघांमध्ये स्पर्धा दिसून येणार.

मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना 23 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरेतने वाट पाहत आहे, कारण हा अशा सामन्यांपैकी एक सामना असणार आहे ज्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होते.

Hardik Pandya And Rohit Sharma

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय

दरम्यान मुंबई विरुध्द चेन्नई यांच्यातील सामन्या आधी मोठी अपडेट समोर येत आहे. या सामन्यात हार्दिक पंड्यावरील बंदीमुळे, रोहित शर्मा या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. तो बाहेर असेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांचा मुंबईचा राजा टीम फिल्डींग सेट करताना दिसू शकतो.

काय आहे प्रकरण ?

हार्दिक पंड्याचा गुन्हा गेल्या हंगामाशी संबंधित आहे. गेल्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही करत होता. खरंतर हा स्लो ओव्हर रेटशी संबंधित विषय आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ओव्हर रेट तीनदा स्लो झाला आहे. तिसऱ्यांदा असे घडल्यानंतर पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. त्यासोबतत 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. योगायोगाने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हा शेवटचा सामना होता. यामुळेच या हंगामात पंड्याला पहिल्याच सामन्यात बाहेर बसावे लागणार आहे.

हार्दिक गेल्या सीझनमध्ये कर्णधार होता

गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. यानंतर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. हार्दिक पांड्याला अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागला. कदाचित यावेळी ते होणार नाही. गेल्या हंगामात केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते, त्यामुळे केकेआरला घरच्या मैदानावर पहिला सामना मिळाला आहे. त्यांचा सामना आरसीबीशी होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+