Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RRचा गोलंदाज तुषार देशपांडेने PBKSच्या प्रियांश आर्यला का ठोकला सॅल्युट, पाहा-Video नेमकं काय घडलं

IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने आयपीएल 2025 च्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीलाच असे काही कृत्य केले की, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुषार देशपांडेने सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्यानंतर त्याने जे कृत्य केले, ते पाहून आता राजस्थानचे चाहते देखील खूश झाले आहेत.

PBKS VS RR IPL 2025

नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्यला राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांने बाद केले. त्यानंतर तुषार देशपांडेंने शांत राहत प्रियांश आर्यला सलामी ठोकली. त्यानंतर प्रियांश आर्य हा पॅव्हेलियमध्ये परतला. पंजाबचा सलामीवीर खेळाडू काही क्षणातच पॅव्हेलियनमध्ये परतल्यामुळे राजस्थानला दिलासा मिळाला. तर चाहत्यांना देखील काही वेळापुरता आनंद साजरा करता आला.

(इमेज सोर्स- www.hotstar.com/in/sports/cricket/)

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरआरकडून गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या फजलहक फारुकीने पहिल्या षटकात 11 धावा दिल्या. पण पुढच्याच षटकात देशपांडेने पंजाबला पहिला झटका दिला.

दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आर्यने एका चांगल्या लांबीच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्हचा चुकीचा वेळ काढला तेव्हा तो बाद झाला. शिमरॉन हेटमायरने उजवीकडे डायव्हिंग करत एक शानदार लो कॅच घेतला आणि क्रीजवर थोडा वेळ राहिल्यानंतर आर्यला परत पाठवले. प्रियांश आर्यने 7 चेंडूत फक्त 9 धावा काढल्या आणि त्याला पुन्हा मैदान सोडावे लागले. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या राजस्थान रॉयल्सने मैदानावर चांगली कसरत करून तुषार देशपांडेने केलेल्या कामगिरीने व त्याच्या सॅल्युट सेलिब्रेशनने राजस्थानच्या चाहत्यांना आनंद दिला.

70 धावा काढून नेहाल बाद

16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंजाबने आपली पाचवी विकेट गमावली. येथे नेहल वढेरा 70 धावा करून बाद झाला. आकाश मधवालच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने त्याला झेलबाद केले. त्याच षटकात नेहलने शशांक सिंगसोबत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पंजाबनेही 150 चा टप्पा ओलांडला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+