Rohit Sharma : हा खेळाडू रोहित शर्माची हात जोडून का माफी मागत होता?, पत्नी रितीकापुढेही का झुकला?
IPL 2025, Rohit Sharma Latest news : आयपीएल 2025 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याला सुरुवातीचे तीन ते चार सामन्यामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला. एक दोन म्हणा किंवा चार पाच धावा काढून रोहित आऊट झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली. परंतु, रोहित आता पुन्हा फॉर्म मध्ये आला आहे. रोहितने गेल्या ४ सामन्यांमध्ये आता ३ अर्धशतके झळकावली आहेत.
हंगामातील ५० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याच्या बॅटमधून एक शानदार खेळीही दिसून आली. या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचा एक खेळाडू रोहित शर्मासमोर हात जोडून उभा असल्याचे दिसून आले. या खेळाडूने रोहितची पत्नी रितिका सजदेहकडेही पाहत हात जोडले. तो रोहितची माफी का मागत आहे, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. सद्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा खेळाडू रोहितसमोर हात जोडून उभा राहिला
दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात, वेगवान गोलंदाज आकाश माधवालने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले. सामन्यानंतर आकाश माधवालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रोहित शर्मासोबत दिसत आहे. खरंतर, सामन्यानंतर, आकाश माधवाल रोहित शर्माचे हात जोडून स्वागत करताना दिसला आणि त्यानंतर दोघांमध्ये एक छोटीशी चर्चा झाली. तुम्हाला सांगतो की, आकाश माधवालने रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, जेव्हा तो मुंबई संघाचा भाग होता. आकाश माधवालने ही रोहित शर्माची सही असलेली त्याची जर्सी मिळवलेली आहे.
No one can earn this with money 🥺🤍
— 𝑲𝒓𝒊𝒔𝒉𝒏𝒂 (@SavageFlyy) May 1, 2025
Rohit Sharma | Akash Madhwal pic.twitter.com/4gRHYrJlDv pic.twitter.com/r28CI8UiUJ
त्याचवेळी, रोहित स्टँडमध्ये बसलेल्या त्याच्या पत्नी रितिका सजदेहकडे बोट दाखवताना दिसला. त्यानंतर आकाश माधवालने हात जोडून रितिका सजदेहला नमस्कार केला. त्यानंतर आकाश माधवालच्या या कृतीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. तर लोक त्याचे कौतुक देखील करत आहे.
आकाशचे आयपीएल कारकिर्द कशी?
आकाश माधवाल 2023 पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने त्याचे पहिले दोन हंगाम मुंबई इंडियन्स संघासाठी खेळले. जिथे त्याने 13 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या. आकाश माधवालने त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच 14 विकेट्स घेतल्या. या काळात त्याने लखनौविरुद्धच्या सामन्यात 5 धावांत 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला.
यावेळी, मेगा लिलावात, राजस्थानने त्याला 1.2 कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात समाविष्ट केले. या हंगामातील हा त्याचा पहिलाच सामना होता ज्यामध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नाही.












Click it and Unblock the Notifications