Ipl 2025 : क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा सामना कुणाशी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू की गुजरात टायटन्स?
Ipl 2025 : आयपीएलमध्ये आता प्ले-ऑफच्या लढती सुरु होत आहेत, काल मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जने धुळ चारली. आता पंजाब किंग्जचा संघ खऱ्या अर्थाने गुणतालिकेत किंग झाला असून प्रिटी झिंटाचा हा संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे. आता प्रश्न हा आहे की, प्लेऑफच्या उर्वरीत तीन संघापैकी पंजाब किंग्जशी क्वालीफायर 1 मॅचमध्ये गुजरात टायटन्स भिडणार की राॅयल चॅलेंजर बंगळुरू...

पंजाब किंग्जने आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफायर-1 मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. जयपूरमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबई इंडियन्स (एमआय) ला 26 मे 2025 रोजी 7 विकेट्सने पराभूत करून लीग स्टेजमध्ये 19 गुणांसह अंतिम फेरी गाठली आहे. आता क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा सामना कोणाशी होईल हे इतरांच्या सामन्यानंतर समजणार आहे.
कोणता संघ पंजाब किंग्जशी भिडणार?
पंजाब किंग्जने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे आणि 14 सामन्यांत 19 गुण मिळवून टॉप-2 मध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएलच्या इतिहासात लीग स्टेजनंतर क्वालिफायर-1 साठी पात्र होण्याची ही त्यांच्यासाठी दुसरी वेळ आहे. पंजाबने आयपीएल 2014 मध्ये पहिल्यांदाच ही कामगिरी केली होती.
मुंबई टाॅप-2 मधून बाहेर
काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा विजय झाला, आता मुंबई इंडियन्सचा पराभवामुळे टॉप-2 संघात स्थान मिळवण्याचा प्रवासही संपला आहे. तर दुसरीकडे प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 19 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
आरसीबी हरल्यास, गुजरात-पंजाब सामना
RCB चा पुढचा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध आहे. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचा सामना क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जशी होईल. दुसरीकडे, जर आरसीबी हरला, तर गुजरात टायटन्सचा सामना क्वालिफायर-1 मध्ये पंजाबशी होईल. हा सामना 29 मे रोजी मुल्लानपूर येथे खेळला जाईल.
गेल्या काही स्पर्धांनंतर यंदा पंजाब किंग्जने या हंगामात आपले वर्चस्व दाखवले आहे, विशेषतः त्यांच्या फलंदाजीमुळे संघ मजबूत झाला आहे. आता क्वालिफायर-1 मध्ये त्यांचा सामना आरसीबी किंवा गुजरातशी होईल, पण पंजाब संघाला दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण दोन्ही संघ पंजाबला कधीही मात देऊ शकतात.आरसीबीचा विजय त्यांना टॉप-2 मध्ये ठेवेल, तर जीटी देखील एक मजबूत विरोधी संघ ठरू शकतो. दोन्ही संघांमधील हा सामना प्लेऑफच्या रोमांचक लढाईत एक नवीन वळण आणू शकतो.












Click it and Unblock the Notifications