किंग कोहली ज्याच्या नेतृत्वाखाली खेळणार तो RCBचा कप्तान रजत पाटीदार कोण?, वाचा त्याची कारकीर्द
Who is RCB Captain Rajat Patidar : IPL 2025 मधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या आरसीबी फ्रँचायझीने मोठा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या टीमचा कर्णधार म्हणून यंदाच्या हंगामासाठी 11 कोटींची किंमत मोजून संघात कायम ठेवलेल्या रजत पाटीदार याला केले. त्याच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती. तर किंग कोहली विराट कोहली देखील त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. चला तर जाणून घेऊया, किंग कोहलीने देखील ज्याचे नेतृत्व स्वीकारले तो रजत पाटीदार नेमका कोण आहे.
काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रॅचायझीने कर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर रजत पाटीदार दिग्ग्जांच्या यादीत सामील झालाय. विराट कोहली देखील रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीच्या खाली खेळणार आहे. पण रजत पाटीदार याची कारकीर्द कशी सुरू झाली, याची खास कहाणी आहे. तो या क्षेत्रात कसा आला, याविषयी जाणून घेऊया..!

रजतला क्रिकेटचं प्रचंड वेड
रजतने आपल्या करिअरची सुरुवात बॉलर म्हणून केली होती. परंतु, कोचच्या सांगण्यावरून त्याने बॅटिंग सुरू केली. अंडर-15 टीममध्ये तो बॅट्समन बनला होता. रजत पाटीदार साधं जीवन जगतो आणि रजतला नेहमीच चांगली कामगिरी करण्याच्या दबावापासून मुक्त ठेवतो. रजतला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं आणि त्याचं क्रिकेटवरचं प्रेम पाहून आम्ही त्याला सतत प्रोत्साहन दिलं. रजतचे वडील मनोहर हे इंदूरच्या महाराणी रोड मार्केटमध्ये मोटारपंपचा व्यवसाय करत होते.
रजत पाटीदार आरसीबीचा कॅप्टन
रजतने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2018 मध्ये रजत विभागीय T20 लीगमध्ये मध्य प्रदेशसाठी पहिली मॅच खेळला. 2018-19च्या सिझनमध्ये रजत मध्य प्रदेशसाठी रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 8 मॅचेसमध्ये 714 रन्स केल्या होत्या. नंतर ऑगस्ट 2019 मध्ये दिलीप ट्रॉफीसाठी त्याला इंडिया ब्लू टीममध्ये घेण्यात आलं. त्यानंतर रजतने चांगली कामगिरी करून त्याचं स्थान टिकवून ठेवलं होतं. अशातच आता रजत पाटीदार आरसीबीचा कॅप्टन झाला आहे.
IPL साठी लग्न पुढं ढकललं
आयपीएल 2021 मध्ये 4 मॅचेसमध्ये 71 रन्स करणाऱ्या रजतला आरसीबीने रिटेन केलं नाही. तसंच फेब्रुवारीमध्ये आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात रजतवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. त्यामुळे रजतने 9 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लवनीथ सिसोदिया जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला 3 एप्रिलला RCB ने 20 लाख रुपयांना खरेदी केलं आणि रजतने लग्न पुढं ढकललं. आम्ही त्याच्यासाठी रतलामची मुलगी निवडली आहे. दोघांच्या लग्नाचा एक छोटासा कार्यक्रम होणार होता आणि त्यासाठी मी इंदूरमध्ये हॉटेलही बुक केलं होतं; पण रजतने IPLसाठी लग्न पुढे ढकललं, असं रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी म्हटलं होतं.












Click it and Unblock the Notifications