Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Bumrah wife : पुण्यात शिक्षण, IT मध्ये नोकरी नंतर क्रीडा पत्रकारिता; कोण आहे बुमराहची पत्नी?

Who is Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan Know Details : जसप्रीत बुमराह, आजच्या घडीचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज. जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ असो की मुंबई इंडियन्स हे संघ पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या भेदक गोलंदाजीनं भल्याभल्यांना बुमराहनं घाम फोडलाय. बुमराह तसा नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता त्याची चर्चा खूपचं आहे. आपणं खूप मोठ्या संकटात अडकावं आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कुणीतरी यावं अशी आशा आपण सारेच बाळगत असतो. अशाच प्रार्थना आणि अपेक्षा मुंबई इंडियन्सच्या संघाकडून केल्या जात आहेत.

मुंबईच्या संघाला आयपीएलमध्ये हवी तशी कामगिरी अद्याप करता आलेली नाही. मुंबईचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह टीममध्ये नसणं हे त्यामागील महत्त्वाच कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र आता मुंबईनं सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण जसप्रीत बुमराह आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

Who is Jasprit Bumrahs wife Sanjana Ganesan

बुमराहच्या बॉलिंगबद्दल, त्याच्या कामगिरीबद्दल सर्वांनाच बरीच माहिती आहे. पण बुमराहचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तेवढचं इंटरेस्टिंग आहे. बुमराहच्या याच वैयक्तिक आयुष्याची बद्दल आपण जाणून घेणार आहोत...!

बीसीसीआयकडून बुमराहला किती मानधन मिळते?

बुमराहनं क्रिकेट कारकिर्दीसोबतच,वैयक्तिक आणि आर्थिक यश देखील मिळवले आहे. जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वात महागड्या क्रिकेटपटूंमध्ये होते. बीसीसीआयच्या ग्रेड ए+ श्रेणीमध्ये, जसप्रीत बुमराहने विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा सारख्या स्टार खेळाडूंसह आपले स्थान निर्माण केले आहे. त्याला वार्षिक ७ कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय, अंबानींच्या मालकीच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्समधूनही बुमराह भरपूर कमाई करतो.

बुमराहची पत्नी कोण आहे, ती काय करतेय?

बुमराहनं संजना गणेशनला आपली जीवनसाथी बनवलं आहे. आज आपण संजना गणेशनचं वैयक्तिक आयुष्य, करिअर, शिक्षण, एकूण संपत्ती आणि जीवनशैली याबद्दल देखील जाणून घेऊया..!

संजना गणेशनने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. संजनाने पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.टेक पदवी घेतली आहे आणि विशेष म्हणजे यात तिनं गोल्ड मेडल मिळवलं आहे.

आयटी कंपनीत नोकरी...

सुरुवातीला ती एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. पण प्रसिद्धीझोतात राहण्याची आवड असल्याने, संजनानं 2012 मध्ये फेमिना स्टाईल दिवा आणि 2013 मध्ये फेमिना मिस इंडिया सारख्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला.

रिअॅलिटी शोमध्ये सहभाग..

2014 मध्ये, संजना गणेशननं एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. परंतु सुरुवातीलाच दुखापतीमुळे ती या शोमधून बाहेर पडली. पण यातून सावरल्यानंतर संजनाने क्रीडा पत्रकारिता करिअर म्हणून निवडली आणि ती स्टार स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये सामील झाली.

क्रीडा पत्रकारिता स्वीकारली

2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी टी-20 विश्वचषक यासह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये संजना अँकर म्हणून दिसून आली. याशिवाय, संजनानं इंडियन प्रीमियर लीग, इंडियन सुपर लीग, बॅडमिंटन प्रीमियर लीग यासारख्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्येही आपली उपस्थिती दाखवली.

संजना गणेशनकडे किती आहे संपत्ती?

स्पोर्ट्सकीडा आणि इतर वृत्तांनुसार, संजना गणेशनची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे 8 कोटी रुपये आहे. संजना विविध टीव्ही शोमध्ये दिसण्यासाठी 20 लाख ते 40 लाख रुपये घेते. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे विलासी जीवन जगतात. अहमदाबादमध्ये त्यांचा एक आलिशान बंगला आहे जो त्यांनी 2021 मध्ये 2 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

याशिवाय, त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मर्सिडीज-मेबॅक कार, 2 कोटी रुपयांची निसान जीटी-आर आणि 87 लाख रुपयांची रेंज रोव्हर वेलार कार आहे. दोघांच्याही कार कलेक्शनमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टा देखील समाविष्ट आहे. तरी ही आहे बुमराहच्या जीवनसाथीची गोष्ट.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+