कोणात्या संघाकडे किती पैसे शिल्लक ? राजस्थानकडे सर्वात कमी तर या संघाकडे सर्वाधिक पैसे
IPL 2025 Purse Money: आयपीएल रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मेगा लिलाव होणार आहे. सर्व दहा संघांकडे चांगले खेळाडू आहेत. अनेक संघांनी एवढा खर्च केला आहे की आता लिलावात त्यांना काहीशी आर्थिक चणचण भासणार आहे. कारण पर्समधील बरीच रक्कम त्यांनी खर्च करण्यात आली आहे.
सर्वात कमी कोणी खर्च केला असेल तर तो संघ आहे पंजाब किंग्स. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता पंजाब किंग्स लिलावात ऑलआऊट होऊन आपल्या आवडीचे खेळाडू विकत घेणार आहे. राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे.

आरसीबीने विराट कोहलीसाठी सर्वात मोठी रक्कम खर्च केली आहे. 21 कोटी रुपये देऊन कोहलीला रिटेन करण्यात आलं आहे. सर्वाधिक शिल्लक रकमेच्या बाबतीत RCB दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीकडे सध्या 83 कोटी रुपये शिल्लक आहेत.
ऋषभ पंतला सोडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सकडेही चांगली रक्कम शिल्लक आहे. दिल्ली संघाकडे 73 कोटी रुपये शिल्लक आहेत. लखनऊ सुपर जायंट्सकडे 69 कोटी रुपये आणि गुजरात टायटन्सकडे 69 कोटी रुपये आहेत.
आयपीएल संघांच्या पर्समध्ये शिल्लक राहिलेली रक्कम
पंजाब किंग्स - 110.5 कोटी
आरसीबी- 83 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 73 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स- 69 कोटी
गुजरात टायटन्स- 69 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज- 55 कोटी
केकेआर- 51 कोटी
हैदराबाद- 45 कोटी
मुंबई इंडियन्स- 45 कोटी
राजस्थान रॉयल्स- 41 कोटी












Click it and Unblock the Notifications