आयपीएलचा पहिला सामना कधी, कुठे, कोणत्या संघांमध्ये खेळला जाणार? संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
IPL 2025: आयपीएलची स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चाहते आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे. परंतु फ्रँचायझी कॅम्पसमध्ये जाऊन संघांसोबत तयारी करण्याची योजना सुरू आहे तर काही खेळाडू आधीच त्यांच्या संघात सामील झाले आहेत.
दरम्यान चाहते पहिल्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या हंगामात मोठा विजय मिळवणारा केकेआर संघ यावेळी खूप बदलला आहे. हा संघ एका नवीन लूकमध्ये दिसत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेसह संघात अनेक नवीन खेळाडूंची एंट्री करण्यात आली आहे.

आयपीएलची ही स्पर्धा मार्च ते मे या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमाला जर भारतीय क्रिकेटचा महाकुंभ म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही. पहिला सामना अशा दोन संघांमध्ये खेळला जाईल, ज्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंतचे वेळपत्रक आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2025 चा पहिला सामना कधी होणार?
आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाणार आहे. केकेआरचे चाहते त्यांच्या नवीन खेळाडूंना पाहण्यासाठी उत्सुक असतील. गेल्या हंगामातील प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर या संघात नाहीत. केकेआर संघासाठी रहाणेचं कर्णधारपद पाहण्यासारखं असेल. कारण स्थानिक क्रिकेटमध्ये राहणेंने उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली आहे. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना कुठे होणार ?
या हंगामातील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या क्रिकेट स्टेडियमला क्रिकेटचा मक्का म्हणतात. या स्टेडियमवर नेहमीच प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येते. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. टॉसची वेळ संध्याकाळी 7 वाजता असणार आहे.
पहिल्या सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. आरसीबीने युवा खेळाडू रजत पाटीदारकडे संघाची जबाबदारी सोपवली आहे. रजत पाटीदारकडे संघाची धुरा दिल्यानंतर विराट कोहलीने त्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे येणा-या सामन्यात कोहलीकडून रजत पाटीदारला पूर्ण पाठिंबा मिळत राहील. दुसरीकडे अजिंक्य रहाणेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा पूर्ण अनुभव आहे.
आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक
22 मार्च, शनिवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 7:30 वाजता कोलकाता
23 मार्च, रविवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, हैदराबाद दुपारी 3:30 वाजता
23 मार्च, रविवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, रात्री 7:30 वाजता चेन्नई
24 मार्च, सोमवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, विशाखापट्टणम, रात्री 7:30 वाजता
25 मार्च, मंगळवार गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, अहमदाबाद, रात्री 7:30 वाजता
26 मार्च, बुधवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, गुवाहाटी, रात्री 7:30 वाजता
27 मार्च, गुरुवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
28 मार्च, शुक्रवार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 7:30 वाजता चेन्नई
29 मार्च, शनिवार गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अहमदाबाद रात्री 7:30 वाजता
30 मार्च, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3:30 वाजता विशाखापट्टणम
31 मार्च, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, गुवाहाटी, रात्री 7:30 वाजता
31 मार्च, सोमवार, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, रात्री 7:30 वाजता, मुंबई
1 एप्रिल, मंगळवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, रात्री ७:३० वाजता लखनौ
2 एप्रिल, बुधवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, रात्री 7:30 वाजता बंगळुरू
3 एप्रिल, गुरुवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रात्री 7:30 वाजता कोलकाता
4 एप्रिल, शुक्रवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रात्री 7:30 वाजता लखनऊ
5 एप्रिल, शनिवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता चेन्नई
5 एप्रिल, शनिवार पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रात्री 7:30 वाजता चंदीगड
6 एप्रिल, रविवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी 3:30 वाजता कोलकाता
6 एप्रिल, रविवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
7 एप्रिल, सोमवार, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 7:30 वाजता, मुंबई
8 एप्रिल, मंगळवार पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रात्री 7:30 वाजता, नवीन चंदीगड
9 एप्रिल, बुधवार गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद, रात्री 7:30 वाजता
10 एप्रिल, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, रात्री 7:30 वाजता बंगळुरू
11 एप्रिल, शुक्रवार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, रात्री 7:30 वाजता चेन्नई
12 एप्रिल, शनिवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दुपारी 3:30 वाजता लखनऊ
12 एप्रिल, शनिवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
13 एप्रिल, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3:30 वाजता जयपूर
13 एप्रिल, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रात्री 7:30 वाजता दिल्ली
14 एप्रिल, सोमवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रात्री 7:30 वाजता लखनऊ
15 एप्रिल, मंगळवार पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, रात्री 7:30 वाजता, नवीन चंदीगड
16 एप्रिल, बुधवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रात्री 7:30 वाजता दिल्ली
17 एप्रिल, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रात्री 7:30 वाजता मुंबई
18 एप्रिल, शुक्रवार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, बेंगळुरू, रात्री 7:30 वाजता
19 एप्रिल, शनिवार गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद दुपारी 3:30 वाजता
19 एप्रिल, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, जयपूर, रात्री 7:30 वाजता
20 एप्रिल, रविवार पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3:30 वाजता नवीन चंदीगड
20 एप्रिल, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रात्री 7:30 वाजता मुंबई
21 एप्रिल, सोमवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, रात्री 7:30 वाजता कोलकाता
22 एप्रिल, मंगळवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, रात्री 7:30 वाजता वाजता लखनऊ
23 एप्रिल, बुधवार, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
24 एप्रिल, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बेंगळुरू, रात्री 7:30 वाजता
25 एप्रिल, शुक्रवार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रात्री ७:३० वाजता चेन्नई
26 एप्रिल, शनिवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, रात्री 7:30 वाजता कोलकाता
27 एप्रिल, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, रात्री 7:30 वाजता मुंबई
27 एप्रिल, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 7:30 वाजता दिल्ली
28 एप्रिल, सोमवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, जयपूर, सायंकाळी ७:३० वाजता
29 एप्रिल, मंगळवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, रात्री 7:30 वाजता दिल्ली
30 एप्रिल, बुधवार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, रात्री 7:30 वाजता चेन्नई
1 मे, गुरुवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर, रात्री रात्री 7:30 वाजता
2 मे, शुक्रवार गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद, रात्री 7:30 वाजता
3 मे, शनिवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रात्री 7:30 वाजता बंगळुरू
4 मे, रविवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3:30 वाजता कोलकाता
4 मे, रविवार पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, धर्मशाळा, रात्री 7:30 वाजता
5 मे, सोमवार, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
6 मे, मंगळवार मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, रात्री 7:30 वाजता मुंबई
7 मे, बुधवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रात्री ७:३० वाजता कोलकाता
8 मे, गुरुवार पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, धर्मशाळा, रात्री 7:30 वाजता
9 मे, शुक्रवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 7:30 वाजता लखनऊ
10 मे, शनिवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, हैदराबाद, रात्री 7:30 वाजता
11 मे, रविवार पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
दुपारी 3:30 धर्मशाला
11 मे, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, रात्री रात्री 7:30 वाजता दिल्ली
12 मे, सोमवार, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रात्री रात्री 7:30 वाजता चेन्नई
13 मे, मंगळवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रात्री रात्री 7:30 वाजता बंगळुरू
14 मे, बुधवार गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, अहमदाबाद, संध्याकाळी रात्री 7:30 वाजता
15 मे, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, रात्री 7:30 वाजता मुंबई
16 मे, शुक्रवार, राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर, रात्री 7:30 वाजता
17 मे, शनिवार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू, रात्री 7:30 वाजता
18 मे, रविवार गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद दुपारी 3:30 वाजता
18 मे, रविवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रात्री 7:30वाजता लखनऊ
20 मे, मंगळवार क्वालिफायर 1, सायंकाळी 7:30 वाजता हैदराबाद
21 मे, बुधवार एलिमिनेटर 7:30 वाजता हैदराबाद
23 मे, शुक्रवार क्वालिफायर- 2, रात्री 7:30 वाजता कोलकाता
25 मे, रविवार, सायंकाळी फायनल 7:30 वाजता कोलकाता
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications