Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Virat Kohli Salary: विराट कोहलीला 21 कोटींऐवजी मिळणार फक्त 13 कोटी, हे आहे कारण

Virat Kohli Salary: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये आपली आपल्या बॅटने छाप पाडत आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीला आयपीएलच्या 18 व्या सीझनमध्ये 21 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले होते. आरसीबीने पुन्हा एकदा कोहलीवर विश्वास दाखवला आहे आणि त्याला कायम ठेवले आहे.

आयपीएलच्या कोणत्या सीझनमध्ये कोहलीला किती पैसे मिळाले?

विराट कोहलीच्या कमाईत 2010 नंतर मोठी वाढ दिसून आली आहे. 2011-2013 पर्यंत विराट कोहलीची कमाई 12 लाखांवरून थेट 8.28 कोटींवर पोहोचली. 2014 ते 2017 पर्यंत कोहलीने 12.5 कोटी रुपये कमावले आणि 2018 ते 2021 दरम्यान त्याची कमाई 17 कोटी रुपयांपर्यंत वाढली. दरम्यान 2022-2024 सीझनमध्ये त्याच्या कमाईत घसरण होत ती कमाई 15 कोटीवर आली. यावर्षी 2025 मध्ये विराटच्या कमाईत 40 टक्क्यांनी वाढून 21 कोटी रुपयांवर पोहोचली, असे टॅक्सोलॉजी इंडियाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

Virat Kohli

कोहलीला फक्त एवढेच पैसे मिळतील

आयपीएलमधील कमाई ही 1961 च्या आयकर कायद्यानुसार "व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून मिळणारे उत्पन्न" म्हणून गणली जाते. अशाप्रकारे विराट कोहलीच्या 21 कोटी रुपयांच्या पगारावर 30% कर आकारला जातो, ज्यामुळे त्याची कर रक्कम 6.3 कोटी रुपये होते. यानंतर जेव्हा उत्पन्न 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते तेव्हा अतिरिक्त 25% अधिभार देखील लागू होतो, जो कोहलीच्या पगारातून आणखी 1.575 कोटी रुपये वजा करतो.

यासोबतच 4% उपकर देखील जोडला जातो, जो 31 लाख रुपये होतो. या सर्व कपातीनंतर कोहलीच्या 21 कोटी रुपयांच्या पगारातून एकूण 8.185 कोटी रुपये कर म्हणून कापले जातात आणि त्याला शेवटी सुमारे 12.815 कोटी रुपये (जवळपास 13 कोटी रुपये) मिळतील.

विराटच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम

भारताचा महान फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, परंतु आता त्याने आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ३० चेंडूत ३१ धावा केल्या. चेपॉकच्या कठीण खेळपट्टीवर विराटने खूपच संथ खेळी केली. पण असे असूनही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराटने आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी टीम इंडियाचा माजी शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा 1057 करण्याचा आयपीएल विक्रम केला होता. आता विराटने चेन्नईविरुद्ध1084 धावा केल्या आहेत आणि धवनला मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+