Video: विराट कोहली पुढचा विश्वचषक खेळेल का? आयपीएल 2025 दरम्यान त्याने स्वतःच केला मोठा खुलासा
Virat Kohli On ODI World Cup 2027: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो त्याची शानदार कारकीर्द लवकरच संपवणार नाही. त्याने आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याबद्दल आणि जिंकण्याबद्दल भाष्य केलं आहे. 2025 मध्ये भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्यावर सतत चर्चा सुरू आहे. विराट कोहली सद्या आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करत आहे. मुंबई विरुद्ध देखील त्याचे चांगली कामगिरी केली.
कोहलीला पुढील विश्वचषक खेळणार का ?
2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयसीसीचे आणखी एक मोठे विजेतेपद जिंकल्यानंतर विराट एकदिवसीय क्रिकेटमध्येही असेच निवृत्ती घेईल अशी अटकळ होती. भारताचा स्टार फलंदाज कोहलीने 2011 चा एकदिवसीय विश्वचषक, 20213 आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे, परंतु अलिकडेच त्याने सांगितले की तो निवृत्ती घेण्यापूर्वी त्याच्या कारकिर्दीत आणखी एक आयसीसी ट्रॉफी जोडू इच्छित आहे.

एकदिवसीय विश्वचषकात भारताचा घरच्या मैदानावर झाला होता पराभव
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ विजेतेपदापासून वंचित राहिला. 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या प्रभावी सरासरीने 765 धावा काढल्याबद्दल कोहलीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. अलिकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना 2027 च्या विश्वचषकापर्यंत त्यांची कारकीर्द सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विराट कोहलीने निवृत्तीबद्दल दिली मोठी अपडेट
आरसीबीच्या इनोव्हेशन लॅब कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात अँकर कोहलीला विचारते की, तुमच्यासाठी पुढचे मोठे पाऊल काय असेल. कोहली म्हणाला, "कदाचित 2027 चा विश्वचषक जिंकणे". आयपीएल 2025 च्या आधी निवृत्तीच्या चर्चांवर कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. कोहली म्हणला की, निवृत्तीबद्दल विचार करत नसल्याचे त्यांने सांगितले, "घाबरू नका. मी कोणतीही घोषणा करत नाहीये. सध्या तरी सर्व काही ठीक आहे. मला अजूनही खेळ खेळायला आवडते, असं कोहलीने म्हटलं आहे.
Question: Seeing In The Present, Any Hints About The Next Big Step?
— virat_kohli_18_club (@KohliSensation) April 1, 2025
Virat Kohli Said: The Next Big Step? I Don't Know. Maybe Try To Win The Next World Cup 2027.🏆🤞 pic.twitter.com/aq6V9Xb7uU












Click it and Unblock the Notifications