'बाजूला ये, मी तुला दाखवतो', जेव्हा विराट कोहलीने मैदानावर या दिग्गज भारतीय खेळाडूला दिली होती'धमकी'
IPL 2025 : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात 42 चेंडूत 67 धावांचा ताबडतोड खेळी केली होती. विराटने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 59 धावा केल्या तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 31 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सविरुद्ध तो फक्त 7 धावा करू शकला होता. विराट हा एकमेव खेळाडू आहे जो आयपीएलच्या सर्व 18 सीझनमध्ये फक्त एकाच संघाकडून खेळला आहे.

दरम्यान विराटने कोहलीने आयपीएल दरम्यानचा एक जुना किस्सा सांगितला आहे. 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील आयपीएलच्या पहिल्या सामन्यात इशांत शर्मासोबत स्लेजिंग करतानाचा त्याचा मजेदार प्रसंग सांगितला आहे. विराट म्हणाला की, आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमच्या नाबाद 158 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या. त्यावेळी इशांत ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता त्यामुळे त्याला भीती वाटत होती.
"बाजूला ये, मी तुला दाखवतो"
जिओहॉटस्टारशी बोलताना विराट म्हणाला, "मी कधीही ही गोष्ट बोललो नाही, ती म्हणजे इशांत आणि मी आमचे सर्व क्रिकेट एकत्र खेळलो, म्हणून मी त्याला खूप वेळा त्याचा सामना केला आहे. पण त्या सामन्यात मला वाटले की, तो वेगळ्या पातळीवर गोलंदाजी करत आहे. जर मी नेटमध्ये त्याचा सामना केला असता तर मला भीती वाटली नसती. पण त्या दिवशी मला वाटले की, मी त्याचा एकही चेंडू मारू शकत नाही आणि ते वातावरण आणि दबावामुळे होते."
विराट म्हणाला की तो त्याला स्लेजिंग करत होता. पर्थमध्ये इशांतने रिकी पॉन्टिंगला बाद केले होते आणि तो भारताचा स्टार खेळाडू होता. त्याने आपले केसही रंगवले आणि तो एक स्टार बनला होता. कोहली हसत-हसत म्हणाला की, "मी इशांतला सांगितले होते, बाजूला ये, मी तुला दाखवतो." पण त्याने हे देखील कबूल केले की हे सर्व फक्त एक खेळाचा एक भाग आहे. विराट आता 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळणार आहे.












Click it and Unblock the Notifications