Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एक बिहारी सब पे भारी! 14 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीला एक मॅच खेळण्याचे किती पैसे मिळतात?

सध्या आयपीएल-२०२५ ची धूम सुरु आहे. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे जे खेळाडू सर्वात महागडे खरेदी केले ते फ्लाॅप ठरले. मग चर्चा सुरु होते ती बिहारच्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीची. या १४ वर्षांच्या खेळाडूने आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये सर्वांना चकीत केले. पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बाँलवर सिक्स ठोकला. त्यानंतर २८ मार्चला त्याने फक्त ३५ चेंडूत खणखणीत शतकही ठोकले. आता आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये त्याला किती पैसे मिळतात, हा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

how much money does Vaibhav Suryavanshi earn

एका सामन्यासाठी किती मिळतात?

आयपीएल २०२५ मध्ये प्रत्येक संघाला गट टप्प्यात प्रत्येकी १४ सामने खेळावे लागतील. वैभव सूर्यवंशीला या संपूर्ण हंगामासाठी राजस्थान रॉयल्सकडून १.१० कोटी रुपये मिळाले आहेत. पण मॅच फी इत्यादींसह वैभव सूर्यवंशीला एका मॅच खेळण्यासाठी १५.३५ लाख रुपये मिळत आहेत. यामध्ये सामना शुल्काची रक्कम ७.५० लाख रुपये आहे.

ऋषभ पंतला पडलाय भारी

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ही रक्कम त्याच्या संपूर्ण आयपीएल हंगामाची आहे. तर महागड्या खेळाडूचा विचार केला तर ऋषभ पंत हा या हंगामात सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला एलएसजीकडून २७ कोटी रुपयांना विकत घेतलेय. परंतु तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही. ऋषभ पंतने ९ डावांत जेवढ्या धावा काढलेल्या नाहीत, तेवढ्या एकट्या वैभव सूर्यवंशीने तीन डावांत काढल्या.

वैभव ऋषभ पंतपेक्षा भारी

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ९ डावांमध्ये ऋषभ पंतने फक्त ११० धावा केल्या. या काळात त्याची सरासरी १२.२२ आहे. स्ट्राईक रेट ९८.२१ आहे. पंतने या ९ डावांमध्ये फक्त ५ षटकार आणि ९ चौकार मारले आहेत. आणि त्याच्या नावावर फक्त एकच अर्धशतक आहे. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने फक्त ३ डावात ऋषभ पंतपेक्षा चांगला खेळ केलाय. त्याने एक शतकही झळकावले आहे. विशेष म्हणजे त्याने हे शथक फक्त ३५ चेंडूत पूर्ण केले. जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक होते. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटूही ठरला. त्याने ३ सामन्यांच्या ३ डावात ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट २१५.७१ राहिला. विशेष म्हणजे तीन सामन्यांत त्याने १६ षटकार आणि ९ चौकार मारले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+