Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RH vs RR : टीम इंडियात संधी नव्हती, अखेर इशान किशनने केला 'हा' पराक्रम; 6,6,6,6,6,6 तुफानी शतक

आयपीएल-२०२५ च्या १८ व्या हंगामातील पहिले शतक आज झाले. राजस्थान राॅयल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांत इशान किशनने पहिले धडाकेबाज शतक ठोकले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या वादळानंतर इशानने आपला जबरदस्त फॉर्म दाखत वादळी शतकी खेळी केली. या डावांत त्याने तब्बल सहा गगनचुंबी षटकारही मारले.

Ishan Kishan s century

इशानचा कहर

इशान किशन आज हैदराबादसाठी आपल्या पदार्पणाचा सामना खेळला. या डावखुऱ्या फलंदाजाने त्याच्या पहिल्याच सामन्यात विक्रम नोंदवला. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे इशानचे आयपीएलमधील पहिले शतक आहे. याआधी, त्याचा सर्वोच्च धावसंख्या ९९ होती. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना९९ धावा केल्या होत्या.

इशानवर अन्याय झाला?

आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशानला यावेळी फ्रँचायझीने कायम ठेवले नाही. त्यानंतर लिलावातही त्याच्यात रस दाखवण्यात आला नाही. अशा परिस्थितीत, सनरायझर्सने त्याच्यावर जुगार खेळला. पहिल्याच सामन्यात त्याने त्याची क्षमता दाखवून दिली. इशानच्या फलंदाजीतही स्वतःला सिद्ध करण्याची उत्सुकता दिसून येत होती. गेल्या काही महिन्यांपासून त्याला टीम इंडियातही जागा मिळत नव्हती. २०२४ च्या सुरुवातीला त्याने बीसीसीआयचा केंद्रीय करार गमावला. याचे कारण म्हणजे त्याने दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला होता. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. इशानने खूप कठीण काळातून प्रवास केला, पण त्याने त्याची मेहनत कमी केली नाही. जी या सामन्यातही दिसून आली.

हैदराबादचा मजबूत स्कोअर

इशानच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने या लीगमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. गेल्या हंगामात, हैदराबादने आरसीबीविरुद्ध तीन विकेट गमावून २८७ धावा केल्या होत्या. या सामन्यात, हैदराबादला खूप प्रयत्न करूनही ही धावसंख्या गाठता आली नाही. २० षटकांत सहा विकेट गमावल्यानंतर संघाला फक्त २८६ धावा करता आल्या. इशानने ४७ चेंडूत १०६ धावा काढत नाबाद राहिला. त्याने त्याच्या खेळीत ११ चौकार आणि सहा षटकार मारले. त्याच्याशिवाय ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या. हेडने त्याच्या डावात नऊ चौकार आणि तीन षटकार मारले. अभिषेक शर्माने ११ चेंडूत पाच चौकारांसह २४ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी यांनी १५ चेंडूत ३० धावा केल्या. हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत ३४ धावा केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+