SRH vs RR: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे कर्णधार का नाही? हे समोर आले मोठे कारण
SRH vs RR: राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याने आयपीएलची सुरुवात केली. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघात मजबूत खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादला फलंदाजी करून धावसंख्या उभारण्यासाठी आमंत्रित केले. दरम्यान, मोठी बातमी म्हणजे संजू सॅमसन कर्णधार म्हणून मैदानात उतरला नाही. तो नाणेफेक करण्यासाठी कमिन्ससोबत उपस्थित नव्हता.
रियान परागने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर संजू सॅमसन कर्णधार का नाही हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल. नियमित कर्णधार सॅमसन असल्याने तो नाणेफेक करायला यायला हवा होता, मग तसे का झाले नाही? असे आता विचारले जात आहे.

फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सॅमसनला फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, या स्थितीत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार बनवला आहे.
SRH vs RR: सॅमसन बनला इम्पॅक्टफूल खेळाडू
पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे रियान परागकडे पुढील तीन सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संजू सॅमसन या सामन्यात खेळणार असला तरी अंतिम अकरामध्ये त्याचा समावेश न करता त्याचा प्रभाव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
SRH vs RR: विकेट किपर कोण आहे?
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभुमीवर राजस्थान रॉयल्सचा विकेट किपर कोण असेल, असाही प्रश्न आहे. याचे उत्तर ध्रुव जुरेल हे आहे, ध्रुव जरेल याचा संघात समावेश आहे. त्याचा संघात यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. जुरेलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे. हेटमायर, फारुकी, आर्चर आणि तिश्ना या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications