कोण आहे प्रिन्स यादव? ज्याने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा असा उडवला की, तो चकीतच झाला; पहा व्हिडीओ
आयपीएल-२०२५ चा हंगाम सध्या जोरात सुरु आहे. आज सनराईज हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सची मॅच सुरु आहे. या मॅचपूर्वी अज्ञात असलेल्या एका २३ वर्षीय फास्ट बाॅलरने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद केले. विशेष म्हणजे हेड बाद झाला तेव्हा तो २८ चेंडूत ४७ धावांवर खेळत होता. मात्र या बाॅलरने त्याचे अर्धशतक होऊ दिले नाही. हा बाॅलर होता प्रिन्स यादव.

कोण आहे प्रिन्स यादव?
२३ वर्षीय प्रिन्स देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये तो प्रसिद्ध झाला. जिथे त्याने ऋषभ पंतच्या पुरानी दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. या तरुणाने स्पर्धेत १० सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामुळे त्याला दिल्लीच्या व्हाईट-बॉल संघात स्थान मिळाले. फास्ट बाॅलर असूनही बाॅलच्या वेगात बदल करण्याची त्याच्याकडे अफलातून क्षमता आहे. त्याची हिच क्षमता पाहून एलएसजीने त्याला खरेदी केले.
You miss, I hit 🎯
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
Prince Yadav gets the huge wicket of Travis Head as his maiden #TATAIPL dismissal 👏
Updates ▶ https://t.co/X6vyVEuZH1#SRHvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/VT3yLLlN9J
किती लागली होती बोली?
उत्तर प्रदेशविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पणात प्रिन्सने नितीश राणा आणि समीर रिझवी यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी आयपीएल मेगा-लिलावात एलएसजीने त्याला 30 लाख रुपयांना करारबद्ध केले. या वेगवान गोलंदाजाने 2024 मध्ये एसएमएटीमध्ये 11 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दिल्लीचा गोलंदाज ठरला. त्याने संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विजय हजारे ट्रॉफीमध्येही प्रिन्सने 22 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications