IPL 2025: आधी डोळा मारला मग गोलंदाजावर तुटून पडला!शुभमन गिलचा व्हिडिओ व्हायरल, सामन्यात केला विक्रम!
IPL 2025 Srh vs gt Shubman Gill's eye-catching video : गुजरात जायंट्सचा कर्णधार शुभमन गिलने कालच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आणि आपणच कसे हुकमी एक्के आहोत हे दाखवून दिले. गुजरातने या सामन्यात हैदराबादवर सफाईदार विजय मिळवला तो शुभमन गिलच्या जोरदार बॅटींगमुळे..या सामन्यात शुभमनने एक विक्रमही केला आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शुभमन डोळा मारताना दिसतो.
कालच्या सामन्यात काय घडले..
IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघादरम्यान राजीव गांधी स्टेडियमवर सामना होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादचा 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघ केवळ 152 धावा करू शकला आणि गुजरातसाठी हे लक्ष्य सहज होते. त्यातल्या त्यात ठरले. कर्णधार शुभमन गिलने शानदार अर्धशतक झळकावत गुजरातचा विजय साकारला तर वॉशिंग्टन सुंदरनेही सुंदर खेळ केला. या खेळीच्या जोरावर गुजरातने या स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला.

गिलने डोळे मिचकावले अन् अर्धशतक
शुभमन गिल हा बऱ्याचदा लव्ह अफेअर्सच्या चर्चेत असतो. एका दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलीशीही त्याचे काहीवेळा नाव जोडले गेले होते. आपल्या डावात त्याने बहारदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने अप्रतिम शॉट्स खेळले. मजा तर तेव्हा आली जेव्हा शुभमनने 11व्या षटकात सामन्यातील सर्वोत्तम स्ट्रोक खेळला. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर गिलने शानदार कव्हर ड्राईव्ह मारला. हा शॉट खेळल्यानंतर गिलने डोळा मारला. त्यानंतर त्याने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढत अर्धशतक साजरे केले.
That wink after that shot🤭❤#ShubmanGill #IPL2025 pic.twitter.com/pdpnbqd9v7
— Aiswarya💫 (@shublove77) April 6, 2025
शुभमन गिलचा हा विक्रम
गिलने डोळा मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर आता कमेंटही येत आहेत. दरम्यान गिलने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले व 43 चेंडूत 61 धावा करत तो नाबाद राहिला. गिलने आपल्या नव्या बॅटने पहिल्यांदाच अर्धशतक झळकावले आहे. गिल गेल्या एक महिन्यापासून एमआरएफ बॅट वापरत आहे, या बॅटने त्याने पहिली फिफ्टी मारली. गिलला ही बॅट वापरण्यासाठी वर्षाला 8 ते 10 कोटी रुपये मिळतात असे टीव्ही 9 च्या वृत्ता म्हटले आहे.
सामन्याचे तीन कि पाँईंट
1. मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या
(SRH vs GT IPL 2025) मोहम्मद सिराज गुजरात टायटन्ससाठी चेंडूने सतत कहर करत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सिराजने नवीन चेंडूने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत, सिराजने आतापर्यंत एकूण 97 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने सुमारे 29 च्या सरासरीने आणि 8.60 च्या इकॉनॉमी रेटने 102 बळी घेतले आहेत. हैदराबादविरुद्ध चार महत्त्वाचे विकेट घेण्यात त्याला यश आले.
2. वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक हुकले
गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. गोलंदाजीत त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने बॅटने चमकदार कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने दोन गडी लवकर गमावले. पण वॉशिंग्टन सुंदरने येऊन झटपट धावा काढल्या आणि सामना गुजरातच्या झोळीत टाकला. गुजरातसाठी पदार्पणाच्या सामन्यात जबरदस्त फॉर्मात असलेला SRH विरुद्ध जीटी वॉशिंग्टन सुंदर, फक्त एका धावेने अर्धशतक झळकावता आले नाही. त्याला मोहम्मद शमीने अनिकेत वर्माच्या हाती झेलबाद केले. सुंदरने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली.
3. कर्णधार शुभमन गिलचे अर्धशतक
फलंदाजांसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. शुभमन गिलने 36 चेंडूत अर्धशतक झळकावून गुजरातचा विजय निश्चित केला. या सामन्यात हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तुम्हालाही आवडेल.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications