Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mohammed Shami : आयपीएल सामन्यादरम्यान मोहम्मद शमीला कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?, गुन्हा दाखल

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडत आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याला ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तसेच मोहम्मद शमीचा भाऊ हसीब शमी यांनी काही मीडियाशी बोलताना सांगितले की, काल (रविवारी) दुपारी 2-3 वाजताच्या सुमारास मोहम्मद शमी यास जीवे मारण्यासंदर्भातील धमकीचा मेल आला आणि आम्ही ताबडतोब अमरोहा पोलिसांना याबद्दल माहिती दिली. अमरोहा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अहवालानुसार, मेलमध्ये असे लिहिले आहे की आम्ही तुम्हाला मारून टाकू आणि सरकार आमचे काहीही करू शकणार नाही. तथापि, ही धमकी का देण्यात आली आहे? ते अद्याप उघड झालेले नाही.

IPL 2025

हैदराबाद संघाचा मुख्य गोलंदाज शमी

आयपीएलमध्ये मोहम्मद शमी हैदराबादचा मुख्य गोलंदाज आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकते. दुखापतीमुळे शमी बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला, जिथे त्याने 9 विकेट्स घेत टीम इंडियाच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

आयपीएलचा हा हंगाम काही खास राहिला नाही

आयपीएलमध्ये मोहम्मद शमीसाठी हा हंगाम काही खास राहिला नाही. शमीने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याने फक्त 6 विकेट घेतल्या आहेत. रनरेट देखील 11 पेक्षा जास्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+