अगोदर ३२ चेंडूत ठोकलं शतक, आता मारलेत सहा सिक्स; हैदराबादला मिळालेला 'हा' नवा सेहवाग कोण? वाचा
आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यांत हैदराबादच्या अनिकेत वर्माने एक भन्नाट खेळी केली. हैदराबादची अवस्था ४ बाद ३७ असताना तो मैदानात आला. आपल्या छोट्याशा खेळीत या २३ वर्षिय प्लेअरने ४१ चेंडूत ७४ धावा कुटल्या. या सामन्यांत त्याने पाच चौकार व सहा गगनचुंबी षठकार ठोकले.

कोण आहे अनिकेत वर्मा?
उत्तर प्रदेश येथी झाशीत जन्मलेला अनिकेत वर्मा हा २३ वर्षिय स्टार फलंदाज आहे. त्याने मध्यप्रदेश प्रिमिअर लीग-२०२४ मध्ये विश्लेषकांची मने जिंकली होती. त्या स्पर्धेत त्याने सहा डावांत २७३ धावा कुटल्या होत्या. याच स्पर्धेत त्याने केवळ ३२ चेंडूत शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. या स्पर्धेत त्याने सहा डावांत तब्बल २५ षटकांत ठोकले होते.
एसआरएचचे वेधले लक्ष्य
अनिकेत वर्मा याच्यातील पाॅवर हिटींग क्षमता हैदराबादने ओळखली. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात हैदराबादने या खेळाडूवर डाव लावला. हैदराबादने त्याला ३० लाख या बेस प्राईजवर विकत घेतले. आज त्याने हैदराबादचा विश्वास सार्थ ठरवत फक्त ४१ चेंडूत ७४ धावा केल्या. त्यात त्याने सहा षटकांरही मारले.
प्रवास सोपा नव्हता
अनिकेत वर्माचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. लहानपणीच त्याने आईचे छत्र गमावले आहे. आईच्या मृत्यूनंतर त्याचे काका अमित वर्मा यांनी त्याचा संभाळ केला. त्याच्या काकाने त्याच्यातील क्षमता ओळखून भोपाळच्या अंकुर क्रिकेट अकॅडमीत त्याला अॅडमिशन घेऊन दिले. या अकॅडमीत प्रॅक्टीससाठी अनिकेतला रोज १३ किलोमिटर प्रवास करावा लागत होता.












Click it and Unblock the Notifications