IPL 2025 शेड्यूल्डमध्ये मोठा बदल: महत्त्वाच्या सामन्याचे ठिकाण बदलले; पोलिसांनी दिले 'हे' मोठे कारण
इंडियन प्रमिअर लीग म्हणजेच आयपीएल २२ मार्चपासून सुरु होणार होता. या आठराव्या हंगामाचा अंतीम सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. ६ एप्रिलला होणारा कोलकत्ता व लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील इडन गार्डनवर होणारा सामना आता गुवाहटीत होणार आहे.

नेमका काय झाला बदल
यापूर्वी कोलकत्ता व लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ६ एप्रिलला सामना होणार होता. हा सामना कोलकत्ता येथे होणार होता. मात्र हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव आता गुवाहटीत खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे कोलकत्यातील फॅन्सची निराशा झाली आहे. हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियम काढला?
आयपीएल २०२३ मध्ये पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्यात आला. चेन्नई विरुद्ध गुजरात (CSK विरुद्ध GT) सामन्यात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. आयपीएल २०२५ मध्येही इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू होईल. सर्व कर्णधारांच्या बैठकीनंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
लाळेच्या वापरावरील निर्बंध उठवले
बैठकीनंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे की चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. कोरोना काळात यावर बंदी घालण्यात आली होती.
इम्पॅक्ट प्लेअर नियम काय आहे?
इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार, नाणेफेकीनंतर, दोन्ही कर्णधारांना प्लेइंग ११ ची यादी आणि पर्यायी खेळाडू म्हणून निवडलेल्या ५ खेळाडूंची यादी द्यावी लागते. या ५ पर्यायी खेळाडूंपैकी कोणताही एक खेळाडू प्रभावशाली खेळाडू बनू शकतो आणि सामन्यादरम्यान प्लेइंग ११ चा भाग बनू शकतो. इम्पॅक्ट प्लेअरच्या जागी, प्लेइंग ११ मधील एका खेळाडूला बाहेर जावे लागते आणि नंतर तो त्या सामन्यात पुन्हा खेळू शकत नाही.
१० संघांच्या कर्णधारांची यादी
चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल
गुजरात टायटन्स - शुभमन गिल
कोलकाता नाईट रायडर्स - अजिंक्य रहाणे
लखनौ सुपर जायंट्स - ऋषभ पंत
मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या (पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव)
पंजाब किंग्ज - श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन (पहिल्या ३ सामन्यांमध्ये रियान पराग)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - रजत पाटीदार
सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स.












Click it and Unblock the Notifications