संजीव गोयंका यांचाही ऋषभ पंतशी जोरदार वाद ? चाहत्यांनी घेतला क्लास
DC vs LSG: दिल्ली कॅपिटल्स विरुध्द लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सोमवारी झालेला सामाना अत्यंत अटीतटीचा पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त पुनरागमन करत लखनऊचा पराभव केला आहे. या सामन्यामुळे चाहत्यांना आयपीएलच्या या सीझनमधील पहिला रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सने 210 धावांचे मोठे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
जेव्हा दिल्लीने आपल्या 6 विकेट गमावल्या तेव्हा लखनऊचा संघ विजयाकडे वेगाने वाटचाल करत होता. त्यावेळी आशुतोष शर्मा नावाच्या वादळाने एकट्याने सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने वळवला. ऋषभ पंतच्या एका मोठ्या चुकीमुळे संघाचा पराभव झाला. पंतने एक सोपी स्टंपिंग चुकवली होती आणि ही विकेट आशुतोषची होती. ही संधी शेवटच्या षटकात आली होती. जर पंतने ही संधी गमावली नसती तर लखनऊ सुपर जायंट्स हा सामना जिंकू शकला असता.

दरम्यान काल रात्री आयपीएलमध्ये पुन्हा तेच चित्र दिसले जे गेल्या वर्षी संपूर्ण जगाने पाहिले होतं. चालू सीझनमधील पहिला सामना गमावल्यानंतर फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांनी लखनऊचा नवा कर्णधार ऋषभ पंतची 'क्लास' घेताना दिसत आहेत. संजीव गोयंका डगआउटसमोर ऋषभला प्रश्न विचारताना दिसत आहेत. या फोटोने गेल्या वर्षी केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात झालेल्या वादाची आठवण करून दिली आहे.
Once a toxic Manager always a toxic Manager #DCvLSG
— Ex Bhakt (@exbhakt_) March 24, 2025
Rishabh Pant #KLRahul Sanjiv Goenka pic.twitter.com/MmFZ4MlCRq
सामन्या संपल्यानंतर संजीव गोएंका आणि ऋषभ पंत यांच्यातील संभाषणाचे फोटो समोर आले. गोएंका आणि पंत यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले. गोयंका खूप रागावलेले दिसत होते आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता की दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला आहे . हे पाहून चाहत्यांना गेल्या वर्षी गोयंका आणि केएल राहुल यांच्यात झालेल्या वादाची घटना आठवली. यानंतर सोशल मीडियावरही गोयंका यांच्यावर टीका झाली. या वर्तनामुळे केएल राहुल लखनऊ सोडून दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे.
या सामन्यात ऋषभ पंतची कामगिरी खराब होती. पंतला 27 कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर लखनऊने त्याला या सीझनसाठी कर्णधारही बनवले. यानंतर त्याच्या कामगिरीत काहीही चांगले दिसले नाही. ऋषभ पंत बाद झाला आणि खाते न उघडताच मैदानाबाहेर गेला. यानंतर त्याच्याकडून विकेटकिपर म्हणून काही चुका झाल्या. त्यामुळे मोठा पराभवाचा सामना दिल्ली कॅपिटल्सला करावा लागला आहे.
Sanjiv Goenka and Rishabh Pant after the game #LSGvDC pic.twitter.com/1UIylojJnJ
— Shubhra 💻👩💻✍ 🎙 (@ShubhraDalakoti) March 24, 2025
Sanjiv Goenka having a chat with Rishabh Pant. pic.twitter.com/6H6WTCxoVc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications