Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

साई सुदर्शनने रचला इतिहास, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा 'हा' रेकॉर्ड मोडला

Sai Sudharsan Creates History: गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने आयपीएल 2025 च्या 51व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक ऐतिहासिक विक्रम रचला आहे. सुदर्शनने 23 चेंडूत 48 धावा ठोकत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज आणि भारतातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर 38 धावांनी विजय मिळवला आहे. साई सुदर्शनने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

साई सुदर्शनचा ऐतिहासिक विक्रम

आयपीएल 2025 च्या 51व्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात साई सुदर्शनने 23 चेंडूत 48 धावांची खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. सुदर्शनने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम केवळ 55 डावांमध्ये करत तो जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श 53 डावांसह पहिल्या स्थानावर आहे. सुदर्शनने भारताच्या दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिनने 59 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

Sai Sudharsan

या सामन्यात सुदर्शनने 9 चौकार ठोकले आहेत. त्याची आक्रमक खेळी पाहून समीक्षक आणि चाहत्यांनी त्याच्या फलंदाजीचं कौतूक केलं आहे. सुदर्शनने या सामन्यात झीशान अन्सारीच्या गोलंदाजीवर आउट होण्यापूर्वी आपली छाप पाडली होती. या विक्रमासह, सुदर्शनने आयपीएलमध्येही एक वेगळा विक्रम नोंदवला. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद 1500 धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये त्याने सचिन तेंडुलकर आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला मागे टाकले. सुदर्शनने हा टप्पा केवळ 35 डावांमध्ये गाठला तर सचिन आणि ऋतुराजला 44 डाव लागले होते.

आयपीएल 2025 मधील सुदर्शनची कामगिरी

आयपीएल 2025 मध्ये साई सुदर्शनने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत गुजरात टायटन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये त्याने 50.40 च्या सरासरीने आणि 154.12 च्या स्ट्राइक रेटने 504 धावा केल्या आहेत. या सीझनमध्ये त्याने पाच अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे. सुदर्शनच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने अनेक सामने जिंकले आहेत. त्यामुळे संघाला प्लेऑफच्या शर्यतीत मजबूत स्थान मिळवून दिले आहे.

या सीझनमधील सुदर्शनच्या खेळीत त्याची टेक्निक कौशल्य आणि आक्रमकता यांचा समतोल दिसून आला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 धावा, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 52 धावा आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 39 धावा अशा महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. सुदर्शनने आपल्या सलामी जोडीदार शुभमन गिलसोबत अनेकदा मजबूत भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याने गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली होती, त्यामुळे गुजरातने तो सामना 39 धावांनी जिंकला होता.

टी- 20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे खेळाडू

- शॉन मार्श - 53 डाव

- बी साई सुदर्शन - 54 डाव

- ब्रॅड हॉज - 58 डाव

- मार्कस ट्रेस्कोथिक - 58 डाव

- मोहम्मद वसीम - 58 डाव

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+