आयपीएल २०२५! राजस्थान राॅयल्सचा पहिला विजय; चेन्नईवर 6 धावांनी मात, शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना
आयपीएल २०२५ च्या ११ व्या सामन्यांत आज राजस्थान राॅयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा या हंगामातील पहिला विजय ठरला. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडिअमवर हा रोमहर्षक सामना रंगला.

राजस्थानचा धुवाधार फलंदाजी
याआधी राजस्थानला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर, त्यांना आरसीबी आणि आरआरकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर, राजस्थानने प्रथम फलंदाजी केली आणि नितीश राणाच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर १८२ धावा केल्या. याचा पाठलाग करताना, सीएसके निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १७६ धावा करू शकले. गायकवाडने कर्णधारपदाची ६३ धावांची खेळी नक्कीच खेळली पण ती संघाच्या विजयासाठी पुरेशी नव्हती.
नितीश राणाचे अर्धशतक
खलील अहमदने पहिल्याच षटकांत यशस्वी जयस्वालला बाद करुन राजस्थानला पहिला धक्का दिला होता. यशस्वी फक्त चार धावा काढू शकला. त्यानंतर आलेल्या नितिश राणाने डाव सावरला. त्याने २१ चेंडून आपले अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसनला २० धावांवर नूर अहमदच्या चेंडूवर आश्विनने झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरैलला नूर अहमदनगरने ३ धावांवर बाद केले. नितिशने या सामन्यांत ८१ धावा केल्या. त्याला आश्विनच्या चेंडूवर धोनीने यष्टीचित केले.
सीएसके केले होते दोन बदल
या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने आज दोन बदल केले होते. मात्र ते कामी आले नाही. चेन्नईने दीपक हुड्डाच्या जागी विजय शंकरला संधी दिली तर सॅम करणच्या जागी जेमी ओव्हरचनला संधी देण्यात आली होती. त्याऊलट राजस्थान राँयल्सने आजच्या सामन्यांत संघ कायम ठेवला होता.












Click it and Unblock the Notifications