KKR Vs RR : भारताला सापडला नवा बुमराह; पापणी लवते न लवते तोच याॅर्कर थेट स्टंपवर? पहा व्हिडीओ
गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात सामना सुरु आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्याच्या धारदार गोलंदाजीसमोर राजस्थान राॅयल्सने नांगी टाकली. याच सामन्यांत कोलकत्याचा वेगवान गोलंदाज वैभव आरोराने एक बाॅल असा याॅर्कर टाकला की, थेट बुमराहची आठवण आली. वैभव आरोराने राजस्थान राॅयल्सचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसनची याच बाॅलवर पापणी लवते न लवते तोच दांडी उडवली.

नेमके काय झाले?
कोलकाताकडून वैभव अरोरा राजस्थान रॉयल्सच्या डावातील चौथी ओव्हर टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्राईकवर होता. वैभवने चेंडू वरच्या दिशेने टाकला. सॅमसन बाहेर पडला आणि शाॅट खेळण्यासाठी जागा निर्माण केली. शॉट मारणार तोच परफेक्ट याॅर्करने संजूच्या पायाजवळचा लेग साईडचा स्टंप उखडून फेकला. संजू ११ चेंडूत फक्त १३ धावा काढून बाद झाला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली होती. त्याने ३७ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. पण कोलकाताविरुद्ध संजूची बॅट शांत राहिली.
बुमराहची आली आठवण
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराने राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसनला एक शानदार याॅर्कर चेंडू टाकला. त्या चेंडूवर संजूकडे उत्तर नव्हते. तो पूर्णपणे हरवला होता. चेंडू लगेच विकेटला लागला आणि त्याच्या लेग स्टंपला मुळापासून उखडून टाकले. हा बाॅल एवढा परफेक्ट याॅर्कर होता की, प्रेक्षकांना बुम बुम बुमराहची आठवण आली. भारताला नवा बुमराह सापडला असेही काहीचे म्हणणे होते.
South Africa x Sanju samson pic.twitter.com/fny8XxOHBG
— (@SelflessEraa) March 26, 2025
दोन्ही संघात एक- एक बदल
राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. फजलहक फारुकी यांची जागा वनिन्दू हसरंगा यांनी घेतली आहे. केकेआर संघातही एक बदल आहे. सुनील नारायण हा सामना खेळत नाहीयेत, त्यांची तब्येत ठीक नाहीये. मोईनने त्याची जागा घेतली आहे. मोईन अलीला केकेआरसाठी पदार्पणाची कॅप मार्गदर्शक ड्वेन ब्राव्होने दिली.
कशी आहे प्लेईंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मोईन अली, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिन्दु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications