VIDEO! बॅटचा केला पाळणा, ग्लोव्ह्जने केला फ्लाईंग किस; पहा 50 झाल्यावर एका 'बापाचे' अनोखे सेलिब्रेशन
आयपीएलच्या १८ व्या हंगामात आज गुवाहाटी येथे सीझनचा ११ वा सामना सुरु आहे. राजस्थान राॅयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या या सामन्यांत एका बापाचं आपल्या मुलांबाबतच प्रेम संपूर्ण जगाने पाहिलं. राजस्थान रॉयल्सचा नंबर तीनचा फलंदाज नितीश राणाने तडाखेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर व्यक्त केलेला आनंद आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

राणाची तडाखेबंद फलंदाजी
चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानला बॅटिंगसाठी बोलावलं. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वी जयस्वाल याने चौकार ठोकत स्वत:चं आणि राजस्थानच्या धावांचं खातं उघडलं. त्यानंतर यशस्वी पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर नितीश राणा मैदानात आला. त्यानंतर संजू आणि नितीश या दोघांनी पावरप्लेचा फायदा घेत तुफान फटकेबाजी केली. नितीश 36 बॉलमध्ये 10 फोर आणि 5 सिक्ससह 81 रन्स करुन आऊट झाला. नितीशने 225 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) March 30, 2025
राणाचे अनोखं सेलिब्रेशन
तडाखेबाज अर्धशतक साजरं केल्यानंतर नितिश राणाने एका अनोख्या स्टाईलने सेलीब्रेशन केलं. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, हा डावखुरा फलंदाज बॅटने पाळण्याची स्टाईल करत आपल्या ग्लोव्हजने प्लाईंग किस देत होता. राणाची पत्नी गरोदर आहे. राणा काही दिवसांत पिता होणार आहे. आपल्या बाळांच्या आगमनापूर्वी त्याने आज केलेली फिफ्टी ही एका पित्याचे प्रेम दर्शविणारी ठरली.
Special celebration in new colours and as a father. Special! 💗👼 pic.twitter.com/1ZiXQdMujW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.












Click it and Unblock the Notifications