Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RCB Vs KKR सामन्यावर पावसाचे सावट; चाहत्यांच्या आनंदावर पडणार विरजन, काय सांगतो वेदर रिपोर्ट

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स KKR : आयपीएल 2025 चे उर्वरित सामने आजपासून (दि.17 मे) सुरू होत आहेत. पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. दोन्ही संघ बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एकमेकांसमोर येणार आहेत. या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहेत. अशातच चाहत्यांसाठी एक चिंताग्रस्त बातमी समोर आलेली आहे.

हा सामना पाहण्याचा विचार करत असाल तर तुमचा उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काल ​​16 मे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडला होता. एवढेच नाही तर आजही सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

अ‍ॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या आसपासच्या भागात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% पर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

ipl 2025

पहिल्या इनिंगमध्ये पावसाचे सावट

एवढेच नाही तर सर्वात वाईट बातमी म्हणजे दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी 7 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. त्या काळात, पावसाची शक्यता जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या काळात पावसाची शक्यता सुमारे 70% असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

तथापि, चांगली बातमी अशी आहे की यानंतर, पावसाची शक्यता हळूहळू कमी होते. रात्री 9 च्या सुमारास पावसाची शक्यता 49% आहे. यानंतर हे प्रमाण आणखी कमी होते आणि 34% वर राहते.

या स्टेडियमवर आहे ही सुविधा

चाहत्यांसाठी एक आनंदाची देखील बातमी आहे, कारण, एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ड्रेनेज सिस्टीम आहे. कारण, पाऊस पडला तरी जमीन लवकरात लवकर कोरडी करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, जर पाऊस थांबला तर ड्रेनेजद्वारे शक्य तितक्या लवकर मैदान कोरडे करून खेळ पुन्हा सुरू करता येईल अशी अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+