बॅट चाचणीत 2 खेळाडू फेल! रोहीतची वेळ आली तेव्हा त्याने असे काही केले की अम्पायर पळाला! वाचा काय झालं
IPL 2025 Rohit Sharma's bat gauge test : रोहीत शर्मा धडाकेबाज फलंदाज, मुंबई संघाकडून खेळणारा हा टीम इंडियाचा सलामीवर..आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून किती धावा निघणार याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असते. अशातच त्याची बीसीसीआयशी पुढच्या कराराबद्दल चर्चा आहे, त्याला तीन महिन्यांनंतर होणाऱ्या करारात पुन्हा पैसे जास्त मिळणार का? हा सवाल असतानाच रोहीतच्या बॅटच्या गेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
रोहीतने अशी काही गोष्ट केली की,त्याच्या बॅटवर शंका घेणाऱ्या पंचाला आपली शंका गुंडाळून रोहीत शर्माजवळून काढता पाय त्याला घ्यावा लागला. रोहीत शर्माने अशी कोणती कृती केली की त्यामुळे पंचालाही निघून जावे लागले याची आपण या लेखात माहिती घेऊया.

आयपीएल 2025 मध्ये बॅटची चाचणी हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही काळापासून खेळाडूंना मैदानावर गेज चाचणी द्यावी लागत आहे. या अंतर्गत, राखीव पंच मैदानावरील फलंदाजांच्या बॅटचा आकार तपासत होते. आतापर्यंत दोन खेळाडूंच्या बॅट अवैध आढळून आल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या बॅटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याची बॅट अंपायरकडे उपस्थित असलेल्या गेजमधून जात नव्हती. त्यानंतर रोहितने असे काही केले की अंपायरला लगेच तेथून निघावे लागले.
याआधी दोन फलंदाज बॅट गेज चाचणीत फेल
15 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होता. या सामन्यात दोन खेळाडूंच्या बॅट गेज चाचणीत फेल ठरल्या. अम्पायारने बॅटची तपासणी केली तेव्हा बॅटची गेज जास्त दिसून आली म्हणजे बॅटची रुंदी जास्त दिसून आली. त्याच्या काहीवेळा आधीच रोहित शर्माच्या बॅटवरही अंम्पायरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
रोहीतसोबत नेमकं काय घडलं होतं?
- दिल्लीविरुद्ध मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.
- रोहित शर्मा त्याचा साथीदार रायन रिकेल्टनसह डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर जात होता.
- रोहीत शर्माला राखीव पंचांनी रोखले आणि त्याच्या बॅटची गेजद्वारे तपासणी केली.
- तपासणीवेळी रोहीत शर्माची बॅट गेजमध्ये अडकली.
- अंपायरच्या म्हणण्यानुसार, रोहितची बॅट निर्धारित मर्यादेपेक्षा जाड होती. त्यामुळे त्यांनी रोहीतला त्या बॅटने खेळण्यास नकार दिला.
- यावर रोहित शर्माला राग आला आणि त्याने लगेच हातमोजे काढले. रोहितने बॅटचे माप पुन्हा तपासायला सांगितले आणि स्वतः गेजमधून काढून दाखवले.
- रोहीतने ही कृती करताच खालून तपासलेल्या बॅटच्या दोन्ही बाजूने मोजमापी योग्य पद्धतीने वर आली आणि गेज तपासणीत रोहीत पास झाला.
- अंपायरलाही गेज तपासणी योग्य वाटली,आधी अम्पायरच स्वःत मोजमाप करताना चुकत होता, त्यामुळे त्याने त्याची जागा पटकन सोडून काढता पाय घेतला.
कोणते दोन खेळाडू चाचणीत फेल ठरले?
केकेआरचे खेळाडू सुनील नरेन आणि ॲनरिक नोरखिया यांच्या बॅटचा गेज योग्य नव्हता असे तपासणीत दिसून आले. त्यामुळे हे दोघे बॅट तपासणीत फेल ठरले. त्याच्या बॅटची रुंदी नियमानुसार नव्हती. त्यामुळे त्यांना बॅट बदलावी लागली आणि दुसऱ्या बॅटने खेळाव लागले.
काय आहेत बॅटसंदर्भातील नियम?
बॅटसंदर्भातील नियम विचारात घेता बॅटच्या पुढील भागाची रुंदी 10.79 सेमीपेक्षा जास्त नसावी, तर त्याच्या ब्लेडची जाडी 6.7 सेमीपेक्षा जास्त नसावी. याशिवाय, बॅटच्या काठाची रुंदी 4 सेमीपेक्षा जास्त नसावी आणि लांबी 96.4 सेमीपेक्षा जास्त नसावी, असा नियम घालून दिलेला आहे. त्यानुसारच फलंदाजांना बॅट वापरावी लागते.












Click it and Unblock the Notifications