Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : रोहित शर्मा आरसीबीचा कॅप्टन! सीएकेमध्ये दिसणार ऋषभ पंत, लिलावानंतर सर्व टीम्स बदलतील?

IPL 2025 : आयपीएल 2025 ची तयारी सुरू झाली आहे. अलीकडेच फ्रँचायझी मालकांनी बीसीसीआयची भेट घेतली आहे. काही फ्रँचायझी मेगा-लिलावात सहभागी होण्यासाठी त्यांच्या योजनांना अंतिम रूप देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,टीम्स फक्त 4 ते 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. बीसीसीआय लवकरच लिलावाची संपूर्ण माहिती जाहीर करणार आहे.

बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा

फ्रँचायझींना मेगा लिलावापूर्वी खेळाडूंचा ट्रेड करण्याची संधीही मिळणार आहे. सर्व 10 टीम्स बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, त्यामुळे आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी खूप चर्चेत असलेल्या पाच संभाव्य ड्रीम ट्रेड्सबद्दल जाणून घेऊया.

IPL 2025

रोहित शर्मा आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो

रोहित शर्माने टीम इंडियाला 2024 टी-20 विश्वचषकात विजय मिळवून दिला आणि आयपीएल 2025 मध्ये त्याच्याकडून कॅप्टनपदाची मागणी केली जाण्याची अपेक्षा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही आणि रोहितला ट्रेड्स द्वारे मिळवल्यास त्याचे नशीब बदलू शकते.

रोहितने कर्णधार म्हणून पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि त्याने पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले.

ऋषभ पंत होणार चेन्नई सुपर किंग्जचा मध्ये सामील

आयपीएलमधून निवृत्तीनंतर एमएस धोनीच्या जागी कोणता खेळाडू घ्यायचा हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जसमोर असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करणारा ऋषभ पंत विकेटमागे आदर्श वारसदार ठरू शकतो. त्याचे CSK मध्ये सामील होणे दीर्घकाळासाठी संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

युजवेंद्र चहलची आरसीबीमध्ये घरवापसी

आरसीबीने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी युजवेंद्र चहलला रिलीज सर्वांना आश्चर्यचकित केले. चहलचा रेकॉर्ड मजबूत असूनही त्याच्यासाठी कोणतीही बोली लावली गेली नाही. चहलने गेल्या तीन सिझनमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत चहलला पुन्हा आरसीबीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

के. एल. राहुल सनरायझर्स हैदराबाद

केएल राहुलने सनरायझर्स हैदराबादमधून आयपीएल करिअरची सुरुवात केली. तो 2014 आणि 2015 मध्ये टीमसाठी खेळला, त्यानंतर त्याला बाहेर करण्यात आले. ट्रेडिंग करणे शक्य असल्यास, SRH राहुलला परत आणण्याचा विचार करू शकते. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडसह सलामीवीर म्हणून राहुल आपली मधली फळी मजबूत करू शकतो.

फाफ डु प्लेसिस चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2022 मेगा लिलावादरम्यान फाफ डू प्लेसिसला पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. डू प्लेसिसने तीन सिझन आरसीबीचे नेतृत्व केले. पण त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणखी एक विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने तो सीएसकेमध्ये परतण्यास उत्सुक असू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+