सूर्यकुमारची 100 वी मॅच : 'MI 'प्लेअर्सने त्याला एका शब्दांत दिलेली 'उपमा' वाचली का? हसून दुखेल पोट
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आज मुंबई इंडियन्स संघासाठी त्याचा १०० वा सामना खेळला. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आज लखनौ सुपर जायंट्सशी खेळत आहे. या सामन्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंनी सूर्याला एका शब्दांत योग्य उपमा देऊन गौरविले. सूर्याला त्याच्याच संघातील खेळाडूंनी दिलेली ही विशेषणे आज चांगलीच चर्चेत राहिली.

एमआय संघाचा उपक्रम
मुंबई इंडियन्ससाठी सूर्याचा हा १०० व्या आयपीएल सामना आहे. या ३४ वर्षीय खेळाडूने गेल्या सात वर्षांपासून या संघाला सोबत दिली आहे. सूर्यकुमार यादवच्या या कामगिरीपूर्वी एमआयने एक्सला एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये सूर्याच्या एमआय संघातील खेळाडूंना त्याचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले होते. एमआयच्या या व्हिडीओला संघातील सर्वच खेळाडूंनी प्रतिसाद दिला. प्रत्येकाने सूर्याचे आपापल्या परिने एका शब्दांत वर्णन केले.
कोण काय म्हणाले?
कर्णधार हार्दिक पंड्याने- मित्
कर्णधार रोहितने- चेंबूर
विघ्नेश पुथूर- चेट्टा (मोठा भाऊ)
अश्वनी कुमार- दादा (मोठा भाऊ)
तिलक वर्मा- भाई है मेरा
ट्रेंट बोल्टने- नंबर ११
मिचेल सँटनर- अविश्वसनीय
किरॉन पोलार्ड- भव्य
रायन रिकेलटन- अभूतपूर्व
लसिथ मलिंगा- किलर
बेव्हॉन जेकब्स- अशक्य
नमन धीर- कोई मैच नहीं है उनका
एमआयसाठी सूर्याचा विक्रम
सूर्यकुमार यादवने ६ एप्रिल २०१२ रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. परंतु तो चार चेंडूंत शून्यावर बाद झाला. त्यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये चार हंगाम खेळला. आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात तो एमआय संघात परतला. तेव्हापासून तो एमआय संघाकडूनच खेळत आहे.












Click it and Unblock the Notifications