Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वतःही फ्लाॅप, संघही हारला, आता BCCI ने केली 'ही' शिक्षा; ऋषभ पंतची 'साडेसाती' थांबता थांबेना

आयपीएलचा इतिहास माहित आहे? असं म्हणतात की, जो खेळाडू हंगामातील सर्वात महागड्या किमतीत खरेदी केला जातो, तो त्या हंगामात फ्लाॅप ठरतो. त्याउलट ५० लाख ते एक कोटींपर्यंत जे खेळाडू लिलावात घेतले जातात, तेच हिरो ठरतात. अगदी असंच यंदाही दिसू लागलंय. तब्बल २७ कोटींना विकत घेतलेल्या ऋषभ पंतची बॅट या हंगामात चालली नाही. शिवाय कर्णधार म्हणून तो आपल्या संघालाही विजय दाखवू शकला नाही. ऋषभ पंतची साडेसाची संपण्याचे नाव घेत नसतानाच आता आयसीसीनेही ऋषभ पंतला दंड ठोकलाय.

Rishabh Pant Failure

२७ कोटींचा प्लेअर फ्लाॅप

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला लिलावात २७ कोटींना विकत घेतले. परंतु, पंत केवळ धावा काढण्यात अपयशी ठरलेला नाही तर संघाचे नेतृत्व करण्यातही तो अयशस्वी ठरलाय. कोणत्या गोलंदाजाचा वापर कधी करायचा, मैदानावर कोणते बदल करायचे, या साध्या गोष्टीही पंतला कळत नसल्याचे आता बोलले जात आहे. विकेटकीपर म्हणूनही ऋषभ पंतने अनेक चुका केल्या आहेत. त्या संघासाठी महाग पडल्या आहेत. सलग सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंतही अडचणीत आला आहे.

तीन सामन्यांमध्ये फक्त १७ धावा

आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात ऋषभ पंत शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून १५ धावांची छोटीशी खेळी आली. यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट काहीतरी अद्भुत करेल, अशी अपेक्षा होती. पण तेथेही पंतच्या खराब फॉर्मचा त्याला काही फायदा झाला नाही. यावेळीही तो बाद होऊन त्याने संघाला अडचणीत आणले.

आयपीएलमध्ये केला दंड

रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौचा ५४ धावांनी पराभव झाला. त्या सामन्यांत लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्याशी संबंधित हा त्याच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा असल्याने, पंतला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे आयपीएलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले. त्यामुळे अगोदरच आपल्या फार्मशी झगडणाऱ्या ऋषभ पंतला आता आर्थिक दंडही सहन करावा लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+