Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिग्गजांना मागे टाकत विराट कोहली रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनला

IPL 2025 Virat Kohli record: आयपीएल 2025 मधील 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील चुरशीच्या लढतीत आरसीबीने 2 धावांनी थरारक विजय मिळवला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत तर रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक धावा करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

सीएसकेनेही शेवटपर्यंत लढा दिला, पण यश दयालच्या शेवटच्या षटकातील शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने या सामन्यात बाजी मारली. या सामन्यात कोहलीने 300 षटकारांचा टप्पा गाठत इतिहास रचला आणि ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली आहे.

virat kohli

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 मे 2025 रोजी रात्री खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या 52 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 213 धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येत विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता. विशेषतः रोमॅरियो शेफर्डने 14 चेंडूंमध्ये 53 धावांची खेळी करत आयपीएलमधील दुसऱ्या सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. कोहलीनेही अर्धशतकी खेळी करत आपली छाप पाडली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

कोहलीच्या नावावर अनेक विक्रम

कोहलीने या सामन्यात पहिल्या 10 चेंडूंमध्ये 28 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या 10 चेंडूंमधील सर्वाधिक धावांचा विक्रम ठरला आहे. याशिवाय, त्याने या सामन्यात एकूण 5 षटकार ठोकले त्यामुळे त्याने आरसीबीसाठी टी-20 क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा टप्पा गाठला आहे. हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

ऑरेंज कॅप कोहलीकडे

कोहलीने यापूर्वी 2014 मध्येही सीएसकेविरुद्ध 5 षटकार ठोकले होते आणि आता पुन्हा एकदा त्याने हा पराक्रम केला. त्याने या सामन्यातील खेळीसह गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली आहे. आता कोहली 2025 सीझनमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज ठरला आहे आणि ही त्याची आयपीएलमधील आठवी वेळ आहे. (2011, 2013, 2015, 2016, 2018, 2023, 2024, 2025).

आरसीबीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने शेवटपर्यंत लढा दिला पण ते 20 षटकांत 5 बाद 211 धावाच करू शकले. आयुष म्हात्रे आणि रवींद्र जडेजाने चेन्नईसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली पण शेवटच्या षटकात यश दयालने उत्तम गोलदांजी करत आरसीबीला 2 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयामुळे आरसीबीने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवत प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

चेन्नईविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड

विराट कोहलीने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्याने पहिल्यांदा आरसीबीसाठी 300 षटकारांचा टप्पा गाठला, ज्यामुळे तो टी-20 क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. याशिवाय, त्याने आयपीएल 2025 मध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आणि त्याची ही आयपीएलमधील आठवी वेळ आहे. कोहलीने ऑरेंज कॅप मिळवत साई सुदर्शनला मागे टाकत आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सीएसकेविरुद्ध 33 डावांत 1084 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 125.46 आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर कोहलीने 4 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली असून त्याने तिथे 132 षटकार आणि 287 चौकार ठोकले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+