Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : न्यूझीलंडचा 'हा' धमाकेदार खेळाडू RCBमध्ये सामील; प्लेऑफमध्ये घालेल का धुमाकूळ!

IPL 2025 : प्लेऑफपूर्वी आयपीएलमधील संघामध्ये खेळाडू बदलांची प्रक्रिया सुरूच आहे. विदेशातील काही खेळाडू त्यांच्या वैयक्तिक कामांमुळे परत जाऊ लागले आहेत. आता त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना संधी मिळत आहेत.

दुसरीकडे, या हंगामात आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळालेले आहे. दरम्यान, आता याच कालावधीत संघात आणखी एका खेळाडूने एंट्री केली आहे. इंग्लंडच्या जेकब बेथेल त्याच्या राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी परत जात आहे. त्याच्या जागी आरसीबीने टिम सेफर्टला (tim Seifert) त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. जेकब बेथेल 24 मे रोजी इंग्लंडला रवाना होईल आणि या हंगामातील आयपीएलमधील त्याची मोहीम संपणार आहे.

IPL 2025

टीम सेफर्टला किती मिळाले पैसे?

मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरसीबीच्या लीग स्टेज सामन्यानंतर तो इंग्लंड संघात सामील होण्यासाठी रवाना होईल. तो 24 मे पासून आससीबीचा सहकारी नसेल. किवी खेळाडू टिम सेफर्टला टी-20 क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव आहे, म्हणूनच आरसीबीने त्याला संघात समाविष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 66 सामने खेळले आहेत आणि 1540 धावा केल्या आहेत. आरसीबीने त्याला 2 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.

पाकिस्तानविरुद्ध विनाशकाही खेळी

हा तोच टिम सेफर्ट आहे, ज्याने या वर्षी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना धुडकावून लावले होते. या वर्षी जूनमध्ये, जेव्हा पाकिस्तान संघ ५ टी-२० सामन्यांसाठी न्यूझीलंडला गेला होता, तेव्हा सेफर्टने त्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. न्यूझीलंडने ती मालिका जिंकली होती आणि टिम सेफर्ट हा विजयाचा हिरो होता. त्या मालिकेत त्याने सर्वाधिक २४९ धावा केल्या, सरासरी ६२ पेक्षा जास्त. स्ट्राईक रेटही २०० पेक्षा जास्त होता. सेफर्टने २२ षटकार आणि २० चौकार मारले होते, म्हणजेच त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना कठीण वेळ दिला होता आणि त्यांना रडवले होते.

टिम सेफर्ट कोण आहे?

टिम सेफर्ट हा न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्याच्याकडे जलद धावा करण्याची क्षमता आहे. या 30 वर्षीय खेळाडूने न्यूझीलंडसाठी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 59 धावा केल्या आहेत. त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28 च्या सरासरीने आणि 142.86 च्या स्ट्राईक रेटने 1078 धावा केल्या आहेत. त्याने 10 अर्धशतकेही झळकावली आहेत. हा खेळाडू जगभरात होणाऱ्या टी-20 लीगमध्ये खेळायला जातो. याआधी तो आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली कॅपिटल्सचा भाग देखील तो राहिलेला आहे.

आयपीएल 2025 : आरसीबीला जेतेपदाची आशा

दरवेळी प्रमाणे, यावेळीही आरसीबी जेतेपद जिंकण्याच्या दिशेने प्रतीक्षा करत आहे. यावेळी अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे. संघ मजबूत दिसत आहे आणि त्यांच्या कामगिरीतही एक चमकदारी दिसून येत आहे.

आयपीएल 2025 : कोहलीची बॅट जोरदार चालतेय

आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या या संघासाठी विराट कोहलीने शानदार कामगिरी केली आहे. कोहलीने या हंगामात आतापर्यंत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळेच आरसीबीने नियमित अंतराने विजय मिळवले आणि पहिल्या चारमध्ये स्थान मिळवले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+