Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रचिन रवींद्रच्या जबरदस्त शॉटने चीअरलीडर जखमी, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

IPL 2025 : आयपीएल मध्ये पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मंगळवारी पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात चेन्नईला पंजाब किंग्जकडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.

मंगळवारी पंजाब किंग्जच्या होम ग्राउंड मुल्लानपूर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने मारलेल्या एका शॉटने चाहत्यांचे मन जिंकले मात्र संघ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणा-या चीअरलीडर जखमी झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवींद्रने शॉट मारल्यानंतर चेंडू पंजाब किंग्जच्या चीअरलीडरच्या हातावर जोरात लागला आहे.

Rachin Ravindra

दरम्यान चेंडू लागल्यानंतर चीअरलीडरला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले, त्यावेळी तिने ताबडतोब वैद्यकीय पथकाची मदत घेतली. या घटनेनंतर दुसरी चीअरलीडरही घाबरली दिसली. पंजाबने दिलेल्या 220 धावांचा पाठलाग करताना रवींद्रने पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेनला पूर्ण ताकदीने शॉट मारला. त्यावेळी चीअरलीडरच्या हातावर जोरात चेंडू लागला.

या घटनेनंतर सलामीला आलेल्या रचिनला संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने बाद केल्यानंतर रचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात त्याने 23 चेंडूत 37 धावा केल्या. ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे मॅक्सवेलने रचिन रविंद्रला बाद करुन संघाच्या चीअरलीडरचा बदला घेतला आहे. या सामन्यात रॅचिनने आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी डेव्हॉन कॉनवेसोबत 6.3 षटकांत 61 धावा जोडल्या.

Take a Poll

प्रियांश आर्यचं वादळी शतक

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 20 षटकांत 219 धावांचा डोंगर उभा केला. पंजाब संघात सुरुवातील विकेट पडत असताना युवा फलंदाज प्रियांश आर्यने संघासाठी 42 चेंडूत 103 धावांची ताबडतोब खेळी केली. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 9 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या इतिहासातील संयुक्त चौथे सर्वात जलद शतक झळकावून त्याने आता आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रियांशच्या या खेळीमुळे पंजाब किंग्जला मोठी धावसंख्या उभारता आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+