IPL 2025 Qualifier 1 : PBKS vs RCB, फायनलमध्ये कोण पोहोचणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट
IPL 2025 चा पहिला क्वालिफायर सामना आज न्यू चंदीगड येथील नव्याने बांधलेल्या पीसीए स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार असून, जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

दोन्ही संघांनी लीग टप्प्यात उत्तम कामगिरी केली असून प्रत्येकी १४ सामन्यांत १९ गुण मिळवले आहेत. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. सामन्याआधी एक नजर टाकूया पिच आणि हवामानाच्या अंदाजावर.
पिच रिपोर्ट - फलंदाजांसाठी पर्वणी ठरणार!
न्यू पीसीए स्टेडियम, न्यू चंदीगड येथील पिचवर सध्या धावांचा पाऊस पाहायला मिळतो आहे. अलीकडील सामन्यांमध्ये येथे मोठे स्कोअर झाले आहेत. खेळपट्टीवर चेंडू व्यवस्थित येतो आणि फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते.
त्यामुळे आजच्या सामन्यातही धावांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांकडे पॉवर-हिटर असल्यानं एक हाय-स्कोअरिंग थरार अनुभवता येईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
हवामानाचा अंदाज - सामना निर्विघ्न होण्याची शक्यता
सामन्याच्या वेळेस, म्हणजे संध्याकाळी न्यू चंदीगडमध्ये आकाश थोडसं ढगाळ असेल. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची कोणतीही शक्यता नाही.
तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस राहणार असून ह्युमिडिटी (आर्द्रता) देखील कमी असेल. त्यामुळे खेळासाठी हवामान पोषक असणार आहे आणि चाहत्यांना संपूर्ण २०-२० षटकांचा थरारक सामना पाहायला मिळणार आहे.
मागील सामन्यात पंजाबची सरशी
लीग टप्प्यात या दोन्ही संघांची एकदा टक्कर झाली होती. त्यावेळी पंजाब किंग्जने बेंगळुरुला त्याच्याच घरी पराभूत केलं होतं. त्यामुळे आरसीबीकडे हा सामना जिंकून बदला घेण्याची आणि २०१६ नंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचण्याची मोठी संधी आहे.
पंजाब किंग्ज संभाव्य संघ:
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, हरप्रीत बरार, काइल जैमीसन, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, युजवेंद्र चहल, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, जेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, अजमतुल्लाह उमरजई, विष्णु विनोद, यश ठाकुर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, पाइला अविनाश.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संभाव्य संघ:
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, टिम सीफर्ट, रसिख सलाम, मनोज भांडागे, स्वप्निल सिंह, ब्लेसिंग मुजाराबानी, टिम डेविड, मोहित राठी, स्वास्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
आज कोण ठरेल फायनलिस्ट?
आजचा सामना कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. एकीकडे पंजाबचा संतुलित संघ तर दुसरीकडे आरसीबीचा अनुभवी आणि उत्साही खेळाडूंनी भरलेला संघ. पिच फलंदाजांसाठी अनुकूल असल्यानं दोन्ही संघांचे धडाकेबाज फलंदाज सामन्याचं चित्र बदलू शकतात.
तुमचा अंदाज काय? पंजाब की आरसीबी - कोण करेल फायनलमध्ये एन्ट्री?












Click it and Unblock the Notifications