IPL 2025 Points Table: CSK Vs KKR सामन्यानंतर कोणता संघ कितव्या स्थानी; प्ले-ऑफमध्ये कोण पोहचणार?
IPL 2025 Points Table : आयपीएलच्या या हंगामात सध्या प्लेऑफची शर्यत फारच रोमांचक बनली आहे. एकीकडे तळाला असलेली चेन्नई सुपक किंग्ज आता चांगला खेळ करत आहे, कालच्याच सामन्यात या संघाने कोलकाता नाईट रायडर संघाचा पराभव केला. यामुळे आता कोलकाता संघ संकटात सापडला आहे. आता आयपीएल गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत.
कोलकाता येथे 7 एप्रिल 2025 रोजी झालेला सामना रोमांचक झाला. या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटच्या षटकात दोन गडी राखून पराभव केला चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्यातच आता कोलकाताचा पराभव करुन या संघाने कोलकाताच्या प्लेऑफच्या मार्गात अडथळे आणले आहेत.

चेन्नई संघाची गुणतालिकेतील स्थिती काय?
धोनीच्या नैतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, या संघाचे आयपीएल स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आल्यात जमा आहे. अशा स्थितीत हा संघ आता शेवटच्या स्थानावर आहे.
प्ले ऑफसाठी केकेआरचा मार्ग बिकट!
चेन्नईविरुद्ध पराभव झाल्याने केकेआरला त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेतच पण एवढ्यावर थांबून चालणार नाही तर नेट रनरेटही या संघाला चांगला करावा लागेल. इतर संघांच्या निकालांवरही य अवलंबून राहावे लागेल. सध्या हा संघ सहाव्या स्थानावर आहे.
प्लेऑफ शर्यत रोमांचक
पॉइंट टेबलमधील मध्यवर्ती लढाई आता अधिक तीव्र झाली आहे आणि अनेक संघ अजूनही टॉप-४ मध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. आरसीबी, मुंबई, गुजरात आणि पंजाब किंग्ज इलेव्हन हे संघ सध्या पहिल्या चारमध्ये आहेत.
आयपीएल 2025 गुणतालिका (IPL 2025 Points Table)
1. गुजरात टायटन्स : अव्वल, जवळजवळ प्लेऑफमध्येच गुजरातने आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.
2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : प्लेऑफच्या उंबरठ्यावर हा संघ असून बंगळुरूने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 16 गुणांसह गुजरातच्या बरोबरीचे आहे. त्यांचा नेट रन रेट (+०.४८२) थोडा कमी आहे, त्यामुळे टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना केवळ जिंकणे आवश्यक नाही, तर त्यांचा एनआरआर देखील सुधारणे आवश्यक आहे.
3. पंजाब किंग्जची : प्रबळ दावेदार पंजाब संघ 11 सामन्यांत 7 विजय आणि 1 बरोबरीसह 15 गुणांवर आहे. त्यांचा नेट रन रेट +0.376 आहे. जर संघाने उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवला तर प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित मानले जाऊ शकते.
4. मुंबई इंडियन्स : मुंबई 12 सामन्यांत 7 विजयांसह 14 गुणांवर आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या लीगमधील सर्वोत्तम आहे. जर इतर संघही हरले तर हा संघही टॉप-4 मध्ये प्रवेश करू शकतो.
5. दिल्ली कॅपिटल्स : प्लेऑफच्या शर्यतीत, दिल्लीने 11 पैकी 6 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णीत राहिला, दिल्ली संघाचे 13 गुण आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
6. कोलकाता नाईट रायडर्स : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाताची परिस्थिती नाजूक झाली आहे. संघाचे 12 सामन्यांत 5 विजय आणि 1 बरोबरीसह 11 गुण आहेत. आता त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
7. लखनऊ : सातव्या स्थानावर लखनऊचा संघ आहे जो आयपीएल स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहे.
8. हैदराबाद : हैदराबाद संघ आठव्या स्थानावर आहे आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.
9. राजस्थान राॅयल : राजस्थान राॅय़ल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
10. चेन्नई सूपर किंग्ज : चेन्नई सूपरकिंग्जचे आव्हान संपुष्टात आले आहे.












Click it and Unblock the Notifications