IPL 2025: 21 सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल, टाॅप 3 स्थानावर कोण, मुंबई कितव्या स्थानी? वाचा
IPL 2025 points table : आयपीएलचा महासंग्राम सुरु झाल्यानंतर मोठी रंगत सामन्यात येत आहे. हायहोल्टेज सामने होत असून जवळपास बहुतांश संघ दोनशे धावांचा टप्पा गाठत आहे. काल 8 एप्रिल 2025 रोजी दोन सामने झाले. त्यात चारही संघांनी प्रत्येकी दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत आयपीएलचे 21 सामने झाले आहेत.
आयपीएलमध्ये काल पहिल्या सत्रात राॅयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबईत तर दुसऱ्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना रंगला. या सामन्यात अनुक्रमे बंगळुरू आणि पंजाब किंग्जने विजय मिळवला. दोन्ही संघानी मिळवलेल्या विजयानंतर पाॅईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. तर जाणून घेऊया. कोणत्या स्थानावर कोणता संघ आहे.

- स्थान संघ
- 1 दिल्ली कॅपिटल्स
- 2 गुजरात टायटन्स
- ३ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- 4 पंजाब किंग्ज
- 5 लखनऊ सुपर जायंट्स
- 6 कोलकाता नाईट रायडर्स
- 7 राजस्थान रॉयल्स
- 8 मुंबई इंडियन्स
- 9 चेन्नई सुपर किंग्स
- 10 सनरायझर्स हैदराबाद
आयपीएल 2025 मधील दिल्लीचा संघ टॉपवर आहे. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात 14 सामने खेळणार आहे. शेवटी टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. सध्याच्या अव्वल चार संघांवर नजर टाकली तर ते
दिल्ली, गुजरात, आरसीबी आणि पंजाब किंग्ज हे संघ आहेत. याआधी लखनऊ चौथ्या क्रमांकावर होता. केकेआरला हरवून लखनऊने पहिल्या चारमध्ये स्थान मिळवले होते पण कालच्या सामन्यात चेन्नईवर पंजाबने विजय मिळवल्यानंतर लखनऊ संघ पाचव्या स्थानावर गेला आहे.
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज संघाची वाताहत
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलमध्ये वाताहत झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पाच वेळा चॅम्पियन संघांबद्दल बोलायचे तर या संघांची अवस्था वाईट असल्याचे दिसते. मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. मात्र संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. गुणतालिकेत तो आठव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज चार सामन्यांत एका विजयासह 9व्या स्थानावर आहे.
गुजरात, आरसीबीची झेप
गुजरात टायटन्सच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर आरसीबी पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. RCB संघाचा निव्वळ धावगती 1.149 आहे.
- दिल्लीचा संघ 3 सामन्यात 3 विजय मिळवून पहिल्या स्थानी (6 गुण)
- गुजरातचा संघ 4 सामन्यात 3 विजय मिळवून दुसऱ्या स्थानी (6 गुण)
- बंगळुरू संघ 4 सामन्यात 3 विजय मिळवून तिसऱ्या स्थानी (6 गुण)
- पंजाब किंग्ज 4 सामन्यात 3 विजय मिळवून चौथ्या स्थानी (6 गुण)
- लखनऊ संघ 5 सामन्यात 3 विजय मिळवून पाचव्या स्थानी (6 गुण)
- केकेआरचा पराभव करून लखनऊने त्यांना गुणतालिकेत मागे टाकण्यात यश मिळविले आहे. कोलकाता संघ सहाव्या स्थानी आहे. (4 गुण)
- राजस्थान रॉयल्स 4 पैकी 2 सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. (4 गुण)
- मुंबई इंडियन्सने पाच सामन्यात एक विजय मिळवला, संघ आठव्या स्थानी आहे. (2 गुण)
- चेन्नईने पाच सामन्यात एक विजय मिळवला, संघ नवव्या स्थानी आहे. (2 गुण)
- शेवटच्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद आहे. हा संघ पाच सामन्यात एक विजय मिळवत दहावे तळाचे स्थानी आहे. (2 गुण)












Click it and Unblock the Notifications