Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

क्रिकेट विश्वातही पाकिस्तानची निघाली इज्जत; 'या' खेळाडूने PSLला लाथ मारून PBKSमध्ये केली एंट्री

IPL 2025, PBKS Vs RR; mitchell owen : पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला आहे. यावेळी एका ऑस्ट्रेलियन सलामीवीराने पीएसएलला झिडकारले अन् थेट आयपीएलमध्ये त्याने एंट्री केली आहे. तो खेळाडू आहे मिचेल ओवेन आहे.

आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी मिचेल ओवेन पंजाब किंग्जमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी, ग्लेन मॅक्सवेल बोटाच्या फ्रॅक्चरमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पंजाबने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला 3 कोटी रुपयांना संघात समाविष्ट केला.

IPL 2025 PBKS vs RR

ओवेनने पाकिस्तान सुपर लीगला मारली लाथ

पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीशी असलेल्या त्याच्या वचनबद्धतेनंतरच ओवेन पंजाबमध्ये सामील होईल असे वृत्त आधी आले होते. भारत-पाकिस्तान तणावानंतर आता सर्व काही बदलले आहे. 23 वर्षीय खेळाडूने पीएसएल अर्ध्यावर सोडले आहे तर झल्मी अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत आहे.

बिग बॅशच्या अंतिम फेरीत ओवेनने ठोकले होते शतक

भारत आणि पाकिस्तानमधील सीमापार तणावामुळे अर्ध्यावरच थांबलेले आयपीएल आणि पीएसएल दोन्ही 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. ओवेन 2024-25 च्या बिग बॅश लीग (BBL) मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आला, जिथे त्याने होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना सर्वाधिक धावा केल्या होत्या.

ओवेनने अंतिम सामन्यात 39 चेंडूत शतक झळकावले, ज्यामुळे हरिकेन्सने डेव्हिड वॉर्नरच्या सिडनी थंडरला पराभूत करून त्यांचे पहिले बीबीएल विजेतेपद जिंकले. ओवेनने 42 चेंडूत 6 चौकार आणि 11 षटकारांसह 108 धावा केल्या आणि हरिकेन्सला 35 चेंडू शिल्लक असताना 183 धावांचे लक्ष्य गाठण्यास मदत केली.

पीएसएलमध्ये 102 धावा काढल्या

मिचेल ओवेनने पाकिस्तान सुुपर लीग 2025 मध्ये झल्मीसाठी सात डावांमध्ये 14.57 च्या सरासरीने आणि 192.45 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या. ओवेन SA20 2025 मध्ये पार्ल रॉयल्सकडूनही खेळला. दरम्यान, पंजाब संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यापासून फक्त एका विजयापासून दूर आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाचा सामना आज रविवारी (18 मे) जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे.

6 फूट 8 इंचाचा गोलंदाज पंजाब किंग्जमध्ये सामील

पंजाब किंग्जने दुखापतीमुळे हंगामाबाहेर पडलेल्या लॉकी फर्ग्युसनच्या जागी न्यूझीलंडचा घातक वेगवान गोलंदाज काइल जेमिसनचा संघात समावेश केला आहे. काइल जेमिसन पूर्वी पाकिस्तान सुपर लीगसाठी खेळत होता, परंतु त्याने पाकिस्तान लीग सोडली आणि आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी, कुसल मेंडिसनेही पीएसएल सोडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोस बटलरच्या जागी गुजरात टायटन्स संघात स्थान देण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+