Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 PBKS vs RR:राजस्थानने पंजाबची विजयी घौडदौड थांबवली; 50 धावांनी केले पराभूत, वाचा हायलाईट्स

Punjab Kings (PBKS) vs Rajasthan Royals (RR) , IPL 2025 :आयपीएल-2025 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) ने पंजाब किंग्ज (PBKS) ला 50 धावांनी पराभूत केले. संघाने सलग दुसरा सामना जिंकला आहे, तर पंजाबला या हंगामात पहिल्यांदाच पराभवला सामोरे जावे लागले.

शनिवारी मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियमवर 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 155 धावाच करता आल्या. नेहल वधेराने 41 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्याने ग्लेन मॅक्सवेल (30 धावा) सोबत 88 धावांची भागीदारी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या. संदीप शर्मा आणि महेश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकांत 4 गडी गमावून 205 धावा केल्या. या स्टेडियममधील हा आयपीएलचा सर्वोच्च स्कोअर आहे. यशस्वी जयस्वालने 45 चेंडूत 67 धावा केल्या आणि रियान परागने 25 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या.

IPL 2025 PBKS vs RR

दोन्ही संघांचे अंतिम इलेव्हन

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग. प्रभाव: प्रियांश आर्य.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष थेक्षाना, युधवीर सिंग, संदीप शर्मा. प्रभावशाली खेळाडू (RR): कुमार कार्तिकेय.

अशी होती पंजाबची खेळी

  • 206 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
  • यानंतर चौथ्या षटकात मार्कस स्टोइनिसही बाद झाला. त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली. कार्तिकेयने 7व्या षटकात प्रभसिमरनला आपला बळी बनवले.
  • यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि नेहल वधेरा यांच्यात एक शानदार भागीदारी झाली. नेहलने ६२ धावांची खेळी केली. मॅक्सवेलनेही ३० धावा केल्या.पण दोघेही एकामागोमाग बाद झाले.
  • यानंतर पंजाबचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि पंजाबला २० षटकांत फक्त १५५ धावा करता आल्या. या पराभवानंतर पंजाबचा विजय रथ थांबला आहे.

अशी होती राजस्थानची खेळी

  • प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. दोघांनीही चांगली सुरुवात केली.
  • राजस्थानला पहिला धक्का 89 धावांवर बसला जेव्हा सॅमसन 38 धावा करून बाद झाला. तथापि, दुसऱ्या टोकाला यशस्वी जयस्वाल आक्रमक स्थितीत दिसला.
  • यशस्वी ६७ धावा करून बाद झाला. यानंतर रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनीही काही शानदार फटके खेळले.
  • ज्यामुळे राजस्थान संघाने २० षटकांत ४ गडी गमावून २०५ धावा केल्या. आता पंजाबला जिंकण्यासाठी २०६ धावांची आवश्यकता आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+