Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : पहिल्या सामन्याआधी KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला RCB चा खेळाडू, काय होते कारण? वाचा

आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा युवा फिरकी गोलंदाज सुयश शर्मा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तेथे जावून त्याने त्याच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही संघांमधील हा हाय-व्होल्टेज सामना आज २२ मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जात आहे. पण त्याआधीही सुयशने त्याच्या जुन्या फ्रँचायझीच्या खेळाडूंसोबत वेळ घालवून चाहत्यांची मने जिंकली.

IPL 2025 Opening Ceremony Update

२१ वर्षीय सुयश शर्मा गेल्या दोन हंगामांपासून केकेआरचा खेळाडू होता. आयपीएल २०२३ मध्ये त्याने ११ सामन्यात १० विकेट्स घेतल्या. पण २०२४ च्या हंगामात त्याला फक्त २ सामन्यात संधी मिळाली. जिथे तो एकही विकेट घेऊ शकला नाही. यानंतर केकेआरने त्याला सोडले. आयपीएल २०२५ च्या लिलावात आरसीबीने त्याला २.६० कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले.

केकेआरने शेअर केला व्हिडिओ

केकेआरने या खास क्षणाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर केला आणि लिहिले- टीम वेगळी आहे, मैत्री तीच आहे! सुयशने आतापर्यंत १३ आयपीएल सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/३० आहे.

पहिल्याच सामन्यांत पावसाची शक्यता

आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. परंतु हवामान त्यात व्यत्यय आणू शकते. भारतीय हवामान विभागाने (IMD) पश्चिम बंगालच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केवळ सामनाच नाही तर उद्घाटन समारंभावरही परिणाम होऊ शकतो.

दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार

यावेळी केकेआर आणि आरसीबी दोघेही नवीन कर्णधारांसह स्पर्धेची सुरुवात करत आहेत. अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत असताना, आरसीबीचे नेतृत्व पहिल्यांदाच रजत पाटीदारकडे सोपवण्यात आले आहे. त्याच वेळी, माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस आता दिल्ली कॅपिटल्सच्या उपकर्णधाराची भूमिका बजावत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+