IPL 2025 : उद्घाटन सोहळा,तारीख,वेळ,सेलिब्रेटी, तिकिटांची किंमत सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या
Ipl 2025 opening ceremony : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा18 वा सीझन 22 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू होणार आहे. या वर्षीचा उद्घाटन समारंभ एक भव्य आणि रोमांचक कार्यक्रम असणार आहे. हा प्रसंग केवळ क्रिकेट प्रेमींसाठीच नाही तर बॉलिवूड आणि संगीत प्रेमींसाठीही खास असेल कारण उद्घाटन समारंभात अनेक मोठे स्टार सहभागी होणार आहेत.
उद्घाटन समारंभात यावेळी दिशा पटानी डान्स सादरीकरण करणार आहे. त्यासोबत प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल देखील सादरीकरण करणार आहेत. तसेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरुण धवन त्यांच्या शानदार डान्स सादरीकरण करणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही स्टार्सची ऊर्जा आणि जबरदस्त डान्स या कार्यक्रमात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण करेल.

चाहते आयपीएलच्या उद्घाटन समारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. हा सामना 22 मार्च रोजी कोलकत्ताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. त्याआधी उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल.
अरिजीत सिंगच्या संगीताची जादू
केवळ बॉलिवूड स्टारच नाही तर गायक अरिजित सिंग देखील आपल्या मधुर आवाजाने या कार्यक्रमात ग्लॅमर वाढवणार आहेत. त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्स इमोशन आणि संगीताचे एक अनोखे मिश्रण असेल, जे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. अरिजीत सिंगसोबतची ही संध्याकाळ एक उत्तम संगीतमय अनुभव म्हणून लक्षात राहील.
आयपीएल 2025 चा उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?
आयपीएल 2025 चा उद्घाटन सोहळा 22 मार्च 2025 रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल.
आयपीएल 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग
आयपीएलच्या उद्घाटनचा हा धमाकेदार कार्यक्रम कसा पाहायचा हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. आयपीएल 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग अधिकार जिओ सिनेमाकडे आहेत. ज्याद्वारे तुम्ही जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर आयपीएल उद्घाटन समारंभ आणि सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
ऑनलाइन तिकीट बुकिंग
तिकिटे BookMyShow, Paytm Insider, IPLT20.com आणि TicketGenie सारख्या अनेक अधिकृत प्लॅटफॉर्मवरून बुक करता येतात.
ऑनलाइन टिकीट बुकिंग करण्याची सोपी पध्दत :
तुमचा आवडता सामन्याची निवड करा (जसं की, उद्घाटन समारंभ) निवडा.
बसण्याची श्रेणी निवडा (सामान्य, व्हीआयपी, इ.).
तुमचे वैयक्तिक तपशील (नाव, ईमेल, फोन नंबर) प्रविष्ट करा.
डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरून पेमेंट करा.
तुमच्या तिकिटाच्या तपशीलांसह एक पुष्टीकरण एसएमएस आणि ईमेल प्राप्त होईल.
ऑफलाइन बुकिंग
ज्यांना प्रत्यक्ष तिकिटे खरेदी करायची आहेत त्यांच्यासाठी:
स्टेडियम बॉक्स ऑफिस: मॅचच्या काही दिवस आधीपासून स्टेडियम बॉक्स ऑफिसवर तिकिटे उपलब्ध होतील.
अधिकृत रिटेल आउटलेट्स: शहरातील विविध अधिकृत मान्यताप्राप्त स्टोअर्स देखील आयपीएल तिकिटे मिळतील.












Click it and Unblock the Notifications